मुंबई : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कोणतीही अनियमितता झालेली नाही, असा दावा करून हे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप याचिकेद्वारे या अहवालाला विरोध केला आहे. परंतु, ईडीला अर्ज करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करून मुंबई पोलिसांनीही गुरूवारी या अर्जाला विरोध करून पुन्हा एकदा विरोधी भूमिका घेतली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ईओडब्ल्यूने प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल विशेष न्यायालयात सादर केला होता. त्यावेळी, बँकेत अनियमितता झाल्याचे पुरावे असल्याचा आणि आरोपपत्र दाखल केल्याचा दावा करून त्या अर्जाला ईडीने विरोध केला होता. तसेच, ईओडब्ल्यूने या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे तपास केला जात आहे. त्यामुळे, ईओडब्ल्यूच्या या भूमिकेमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असा दावा ईडीने केला होता. मात्र, दोन स्वतंत्र यंत्रणाद्वारे प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि त्यांचा तपासही परस्परापासून वेगळा असणार, या कारणास्तव ईडीचा हस्तक्षेप अर्ज विचारात घेतला जाऊ शकत नाही, असे नमूद करून विशेष न्यायालयाने ईडीचा अर्ज फेटाळून लावला होता. या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याबाबतची याचिका प्रलंबित आहे.

व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
indian banks facing various challenges amid high interest rate
भारतीय बँकांना नफ्याला कोरड; जगातिक संस्थेचा इशारा नेमका काय?
Liquidity deficit in indian banking system hits lowest level in nearly 15 years
भारतीय बँकिंग व्यवस्थेची तरलता १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर… खडखडाटामुळे कर्जे आणखी महागणार?
Liquidity in the banking system fell to a 15 year low print eco news
बँकिंग व्यवस्थेतील तरलता १५ वर्षांच्या तळाला; उपायादाखल रिझर्व्ह बँकेकडून ६०,००० कोटींची लवकरच रोखे खरेदी
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?

हेही वाचा : कोकणातील रेल्वेगाड्यांचे दोन डबे वाढवले

दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे युती सरकार सत्तेत आले. त्यानंतर, या बँक गैरव्यवहार प्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे घोटाळ्याशी संबंधित उपस्थित केलेले मुद्दे आणि ईडीने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याचे मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाला सागण्यात आले. न्यायालयानेही ईओडब्ल्यूला पुढील तपास करण्यास परवानगी दिली.

हेही वाचा : बाणगंगाच्या पायऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करा, पालिका आयुक्तांच्या सूचना

काही महिन्यांपूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार सत्तेत दाखल झाले. दुसरीकडे, बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आलेली नाही. तसेच, विविध संस्थांना दिलेले कर्ज आणि साखर कारखान्यांच्या विक्रीमुळे बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही, असा दावा ईओडब्ल्यूने पुन्हा एकदा प्रकरण बंद करण्याची शिफारस करणाऱा अहवाल विशेष न्यायालयात दाखल केला. या अहवालाविरोधातही ईडीने हस्तक्षेप याचिका करून विरोध केला. ईडीच्या अर्जावर ईओडब्ल्यूने गुरूवारी भूमिका स्पष्ट करताना त्याला विरोध केला. ईडीने यापूर्वी केलेला हस्तक्षेप अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्याबाबतचे ईडीचे अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे, ईडी पुन्हा हस्तक्षेप अर्ज करून आपल्या अहवालाला विरोध करू शकत नाही, असा दावा ईओडब्ल्यूने केला आहे. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यात ठेवली आहे.

Story img Loader