बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अ‍ॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अशाप्रकारे राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते अशाप्रकारच्या वादात सापडलेले आहेत. अगदी आयपीएल सट्टेबाजीपासून ते बिटकॉन्स प्रकरणासंदर्भात यापूर्वी राज कुंद्रांना अनेकदा न्यायालयाच्या आणि पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. जाणून घेऊयात याच प्रकरणांबद्दल…

snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम

इक्बाल मिर्ची कनेक्शन

२०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केलेला. त्यामुळेच राज कुंद्रांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं.

इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली होती. रंजित बिंद्रा इक्बाल मिर्चीसाठी काम करतो असा आरोप आहे त्याचमुळे राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये भर पडली. मात्र राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्यासंदर्भातली माहिती आढळली. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं होतं.

बिटकॉईन घोटाळा

बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने २०१८ साली समन्स बजावले होते. २ हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं. समन्स जारी केल्यानंतर ५ जून २०१८ रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते. या कार्यालयात इडीच्या अधिकाऱ्यांकडून राज कुंद्रांची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारतद्वाज अटकेत आहे.

बिटकॉईन घोटाळा प्रकरण मनी लॉन्डरिंगशी संबंधित आहे. त्याच अनुषंगाने राज कुंद्राची चौकशी झाल्याचे आणि त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. गेट बिटकॉन्स डॉट कॉम या नावे एका वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. एवढेच नाही तर या वेबसाइटद्वारे हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात राज कुंद्रा यांचेही नाव समोर आल्याने त्यांची चौकशी करण्यात आल्याचे ईडीने म्हटलं होतं. या योजनेत सुमारे ८ हजार लोकांचे २ हजार कोटी रुपये बुडाले असल्याचीही माहिती समोर आली होती.

आयपीएल सट्टेबाजी…

राज कुंद्रा यांचे नाव याआधी आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही समोर आले होते. त्यांना हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. तर राजस्थान रॉयल्सचे ते सहमालक होते मात्र या संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१३ साली आयपीएल सट्टेबाजी प्रकरणावरून राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्रा यांचे निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या नवी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला होता. त्यांच्यावर गरज पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून याआधीच देण्यात आले होते. राजस्थान रॉयल्सचे हिस्सेदार कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

“राज कुंद्रा प्रकरणावर बैठकीत सखोल चर्चा झाली, त्यानंतर कुंद्रा आरोपांतून मुक्त होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना पुन्हा आपली पत मिळवता येईल”, असं सांगण्यात आलेलं. कुंद्रावरील आरोप सिद्ध झाल्यास राजस्थान रॉयल्सची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात येईल. हे संकट टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने आधीच कुंद्रापासून अंतर ठेवण्यास प्रारंभ केल्याचं दिसून आलं होतं. तसेच नियमांचा भंग केल्यास कुंद्रा यांना आपली भागीदारी गमवावी लागेल, असे राजस्थान रॉयल्सकडून स्पष्ट करण्यात आले होतं. मात्र कुंद्रांमुळे राजस्थानच्या संघाला स्पर्धेतून दोन वर्षांसाठी बाद करण्यात आलेलं.

ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक

२०१७ मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरु केला होता. व्यवसायात नफा व्हावा, यासाठी रवी मोहनलाल भालेरीया या व्यापाऱ्याने बेस्ट डील टीव्ही कंपनी मार्फत ५ कोटी रुपयांच्या बेडशीटची ऑर्डर घेतली होती. या व्यवहारात २३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१७ साली सचिन जोशीसोबत वाद…

आयपीएल राजस्थान रॉयलचे पूर्व मालक राज कुंद्रा आणि अभिनेता सचिन जोशी यांनी एकमेकांवर फसवणुकीचा आरोप केला होता. राजने २०१७ पोकर लीगची स्थापना केली होती. या लीगचा सचिनही एक भाग होता. इंडियन पोकर लीगमध्ये सचिनची टीम होती. त्याच्या टीमची तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. पण या लीगमध्ये त्याने कोणतेही पैसे भरले नाही. सचिनने ४० लाखांचा एक धनादेश दिला होता, जो नंतर बाऊन्स झाला असा आरोप राज यांनी केला होता. सचिन जोशीने राजच्या या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, राजने या लीगमध्ये गैरव्यवहर केले. या लीगमध्ये कोणती टीम जिंकणार हे त्याने आधीच ठरवले होते. जेव्हा जोशीला याबद्दल माहित पडले तेव्हा त्याने या लीगमधून काढता पाय घेतला. जोशीच्या प्रवक्त्याने सांगितले की, राज कुंद्रासोबत कोणताही करार केला नव्हता, त्यामुळे त्याला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही.