अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगणाऱ्या विनोद वाथन (३०) या तरुणास ओशिवरा पोलिसांनी अटक केली असून त्याच्या सोबत असलेल्या उमेश त्रिपाठी या साथीदाराचा तपास सुरू आहे.  कर्जाऊ घेतलेले ६० हजार रुपयांचे धनादेश न वटल्याने एका व्यक्तीला पत्नीसमोर मारहाण केली. त्यामुळे निराश झालेल्या तहजेबने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हा प्रकार उघड झाला.
 विनोद वाथन आणि उमेश त्रिपाठी हे मित्र आहेत. शिल्पा शेट्टी हिचा आपण स्वीय सहाय्यक असल्याचे विनोद सांगत असे. विनोदकडून तहजेब खान याने ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात त्याने विनोदला काही धनादेश दिले होते. मात्र हे धनादेश न वटल्याने संतापलेला विनोद दोन दिवसांपूर्वी उमेशला सोबत घेऊन तहजेबच्या घरी गेला. तेथे त्या दोघांनी तहजेब आणि त्याच्या नोकराला तहजेबच्या पत्नीसमोर मारहाण केली आणि मोबाइल घेऊन पळ काढला. त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले असता त्याने पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली.