‘आदर्श’ चौकशीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याचे टाळण्यात आल्याने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत संशयाचे वातावरण तयार झाले असून यावरून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल नाराजीची भावना पसरली आहे.
‘आदर्श’चा कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) तयार झाला नसल्याने सादर करण्यात आला नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र शिंदे, अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आल्याने हा अहवाल सादर करण्याचे लांबणीवर टाकण्यात आल्याची चर्चा आहे. संसदेचे अधिवेशन सोमवारी सुरु होत असताना शिंदे अडचणीत येऊ नयेत म्हणूनच हे करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in