मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच समाज माध्यमांवरही हा वाद रंगायला लागला आहे. फेसबुक पोस्टवरून ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख संदीप पाटील यांना शिंदे गटाच्या विभाग संघटिका प्रिया सरवणकर – गुरव यांनी घरी घुसून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दादर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : बेस्टच्या ‘चलो कार्ड’च्या तुटवड्यामुळे प्रवाशांची गैरसोय, उपक्रमातील अधिकाऱ्यांचे मात्र मौन

प्रिया सरवणकर – गुरव या दादरचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र हा अर्ज मागे घेण्यात आला. त्याबाबत प्रिया सरवणकर – गुरव यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावर पाटील यांनी ‘उशीराने आलेले शहाणपण’ अशी टिप्पणी केली. त्यानंतर संदेशाद्वारे प्रिया सरवणकर – गुरव यांनी धमकी दिल्याची तक्रार पाटील यांनी दादर पोलिसांकडे केली. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे. याबाबत भागडीकर यांना विचारले असता तक्रार अर्ज प्राप्त झाल्याचे मान्य करत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde and thackeray factions conflict over facebook post in dadar mumbai print news zws