पाटण्यातील गांधी मैदानावर आयोजित मोदींच्या सभेत रविवारी क्रूडबॉम्बचे सहा स्फोट झाले. त्यात पाच जण ठार तर ६६ जण जखमी झाले. मात्र, त्यानंतरही केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे सायंकाळी मुंबईत ‘रज्जो’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला उपस्थित होते. मी मुंबईत असल्यामुळेच कार्यक्रमाला हजर राहिलो. परंतू बॉम्बस्फोटाची सर्व माहिती घेऊनच कार्यक्रमाला आलो असल्याचे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, शिंदे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टिकेची झोड उठत आहे. दरम्यान, कॉंग्रेसची ही संस्कृतीच असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या एका वरीष्ठ नेत्याने दिली आहे.    
पाटण्यात प्रथमच भाजपतर्फे आयोजित ‘हुंकार रॅली’त नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार होती. मात्र, या सभेला काही तास शिल्लक असतानाच पाटणा रेल्वेस्थानकातील प्रसाधनगृहात क्रूडबॉम्बचा स्फोट झाला. देशभरात हाय अलर्ट असतानाही केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सायंकाळी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला उपस्थित होते. लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील यांच्य़ा ‘रज्जो’ या चित्रपचटाचा संगीत अनावरण सोहळा हा पूर्वनियोजित होता, त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात काहीच गैर नाही, असं समर्थनही यावेळी शिंदे यांनी केलं. मुंबईतून आपण पाटण्यातील अधिकाऱ्यांच्या आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपर्कात असून सर्व माहिती घेत आहोत, असे सांगत स्वत:चा बचावही करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी यावेळी केला.  
कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे यांच्यासह चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील, यात प्रमूख भूमिकेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत, नृत्य दिग्दर्शक गणेश हेगडे, संगीतकार प्रितम सिंग आणि बॉलीवूडमधील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde busy in music launch event after blast in patna
Show comments