शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात, असंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (२३ मे) मुंबईत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रताप सरनाईक म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. आम्हाला कोट शिवायला टाकायची गरज नाही. एकनाथ शिंदे आम्हाला कोटासह मंत्रीपद देतील. लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. कालही त्यांनी याबाबत सांगितलं आहे.”

हेही वाचा : ठाण्यात शिंदे गटातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, प्रताप सरनाईक आणि दिलीप बारटक्के यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप

“थोडी फार संकटं होती तीही दूर झाली”

“थोडी फार संकटं होती तीही दूर झाली आहेत. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. ते नक्कीच मंत्रीमंडळ विस्तार करतील,” असंही प्रताप सरनाईक यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction mla pratap sarnaik on eknath shinde devendra fadnavis cabinet expansion pbs