ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं.

या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी डान्सबारचे अध्यक्ष शेट्टी यांना जी शिक्षा देण्यात आली तिच शिक्षा संजय राऊतांना देण्यात यावी, अशी मागणी आपण सभागृहात करणार आहोत, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

हेही वाचा- “जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही”, राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, सभागृहाच्या कामकाजात चर्चा होणं, आरोप-प्रत्यारोप होणं, या गोष्टी चालत असतात. गरमागरमी सुरू असते. पण बाहेरचा माणूस या सभागृहाला चोरमंडळ कसं काय म्हणू शकतो. सभागृहातील एक सदस्य चार लाख लोकांमधून निवडून येतो. या सभागृहातील २८८ आमदारांना आणि या सभागृहाला चोर म्हणावं, हा लोकशाहीचा, सभागृहाचा आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा हा अपमान आहे.

हेही वाचा- “जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही”, राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

“त्यामुळे आज सगळ्या सभासदांनी मागणी केली की, अशा माणसावर हक्कभंगाची कारवाई केली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला आहे. दोन दिवसांनंतर अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. पण आमची मागणी अशी आहे की, ज्यावेळी डान्सबार बंदी कायदा आणला होता. त्यावेळी शेट्टी नावाचे व्यक्ती डान्सबारचे अध्यक्ष होते. त्यांनीही सभागृहाच्या बाबतीत अपशब्द वापरले होते. त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा दिली, तशीच शिक्षा संजय राऊतांना देण्यात यावी, अशी मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.

Story img Loader