‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या १४ श्री सेवकांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. श्रीसेवकाच्या मृत्यूचा आकडा ५०च्यावर गेला असून श्रीसेवकांना पैसे देऊन शांत केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, या आरोपांनंतर आता शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या…”, ठाकरे गटाचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र; ‘त्या’ फोटोवरून लगावला टोला!

काय म्हणाले संजय शिरसाट?

“संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन फालतूची बडबड करत असतात. गुरुवारी सकाळीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खारघरमधील घटनेबाबत चुकीची माहिती दिली. या घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, याचं दु:ख सर्वांनाच आहे. मात्र, या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. त्यांनी ५० लोकांना मृत्यू झाल्याची चुकीची माहिती दिली. तसेच त्यांनी श्रीसेवकांना पैस देऊन शांत केल्या जात असल्याचा आरोपही केला. त्यामुळे आम्ही आज संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

हेही वाचा – मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ज्यावेळी सरकारने…”

“श्रीसेवकांची व्याख्या अजून संजय राऊतांना माहिती नाही. श्रीसेवक हे स्वत:चे पैसे खर्च करून निस्वार्थ भावाने समाजाची सेवा करतात. अशा श्रीसेवकांवर आरोप करणं, चुकीचं आहे. या घटनेबाबत बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही माझ्या परिवारातील सदस्य गेल्याचं दु:खं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तरीही संजय राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…तर तत्काळ राजकारणातून निवृत्ती घेईन”, खारघर प्रकरणावरून नरेश म्हस्केंचं सुषमा अंधारेंना खुलं आव्हान

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

बुधवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी श्रीसेवकांच्या मृत्यू प्रकरणावरून शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला होता. “खारघर येथे श्रीसेवकांचा पाण्याशिवाय तडफडून मृत्यू झाला. काही कायकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा ५०च्यावर गेला आहे. मात्र, सरकार हा आकडा लपवते आहे. पाणी मागण्याऱ्या श्रीसेवकांचे बळी या सरकारने घेतले आहेत. या घटनेतील मृत्यूंचा आकडा पुढे येऊ नये, यासाठी पैशांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. श्रीसेवकांच्याबाबत चर्चा होऊ नये, त्यांच्या कुटुंबियांनी जास्त काही बोलू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla sajay shirsat file fir against sanjay raut after allegation regarding shreesevak death spb
Show comments