भाजप व संघांच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कडाडून टीका केली आहे. शिंदे यांचा आरोप पूर्णपणे खोटा, निराधार व बेजवाबदार असून त्यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टिका संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केली.
दहशतवादाला हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असे संबोधन वापरून कॉंग्रेस आणि शिंदे यांनी शांतीप्रिय हिंदू समाज आणि भारताच्या सन्यासी परंपरेचा अपमान केला आहे. या विधानांमुळे भारतीय सुरक्षा दलाचे मनोबल खचू शकते त्यामुळे कॉंग्रेस आणि शिंदेंनी हिंदू समाज आणि सुरक्षा दलाची माफी मागावी अशी वैद्य यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाला प्रोत्साहन मिळत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्यानंतर गेले दोन दिवस त्यावर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde must apologise hindu community and defence manmohan vaidya