कबीर कला मंचचे कार्यकर्ते शीतल साठे (२७)आणि सचिन माळी (३०) मंगळवारी दुपारी पोलिसांना शरण आले. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना अटक केली. नक्षलवादी चळवळींशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भूमिगत होते.
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास शीतल आणि सचिन कार्यकर्त्यांसोबत विधानभवनाच्या आवारात आले. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. त्यांच्या सोबत रिपाईचे नेते प्रकाश आंबेडकर, मार्क्सवादी पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो, आनंद पटवर्धन आणि इतर कार्यकर्ते हजर होते. पोलिसांनी ठेवलेल्या खोटय़ा आरोपांचा त्यांनी निषेध केला. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर दहशतवादविरोधी पथकाकडे सुपूर्द केले.
याप्रकरणी न्यायालयात आव्हान देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दहशतवादविरोधी पथक आणि राज्य पोलीस त्यांच्या मागावर होते.
शरण जाण्यापूर्वी शीतल आणि सचिन यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडण केले.
२०११ साली दहशतवाद विरोधी पथकाने एंजला सोनटक्के (वय ४२) यांना ठाण्यातून तर सुषमा रामटेके यांना (२७) पुण्यातून अटक केली होती. त्याच्या नंतर पोलिसांनी अटकसत्र सुरूच ठेवत जेनी (२३) ज्योती चोरघे (१९) आणि अनुराधा सोनुले (२३) यांनाही पुण्यातून अटक केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा