ओबीसी समाजात सुरू झालेल्या धर्मातराच्या चळवळीच्या तीव्र प्रतिक्रिया येथील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हिंदू धर्मधुरिणांनी या चळवळीला विरोध केला असला, तरी संभाजी ब्रिगेडने मात्र या धर्मातर चळवळीचे जाहीर समर्थन केले आहे. इतकेच नव्हे, तर डॉ. आ. ह. साळुंखेप्रणीत शिवधर्म हा आमच्यासाठी एक विसावा (थांबा) आहे, अंतिम मुक्कामाचे ठिकाण बौद्ध धर्मच आहे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
राज्यातील ओबीसी समाजातील विविध समाज घटकांनी हिंदू धर्माचा त्याग करून समतावादी, बुद्धिवादी व विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्वीकार करावा यासाठी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी राज्यभर ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ अभियान सुरू केले आहे. फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या अध्यक्षतेखाली गेल्याच आठवडय़ात पुण्यात झालेल्या धर्मातर जनजागृती परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात ओबीसी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. धर्मातराशिवाय आता पर्याय नाही, असा या सर्वाचाच सूर होता. या परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती आश्चर्यकारक होती. हिंदू धर्मातून बाहेर पडण्याच्या ओबीसींच्या चळवळीचे त्यांनी स्वागत आणि समर्थन केले. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रेरणेने स्थापन झालेला शिवधर्म हा आमच्यासाठी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा एक टप्पा आहे.
शिवधर्मही अंतिमत: बौद्ध धम्मातच विलिन होणार आहे, अशी घोषणा करून गायकवाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.देशातील सर्व ओबीसी हे नागवंशी , मुळातले बौद्ध धर्मीय आहेत.. ओबीसींची स्वृगृही परतण्याची वाटचाल सुरू झाली आहे.हनुमंत उपरे, अध्यक्ष, सत्यशोधक ओबीसी परिषद बौद्घ धम्माइतके सुस्पष्ट समतावादी तत्त्वज्ञान जगात नाही. त्याच मार्गाने आम्हाला जावे लागणार आहे.प्रवीण गायकवाड, अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
‘शिवधर्माचा ‘अंतिम थांबा’ बौद्ध धर्मातच!’
ओबीसी समाजात सुरू झालेल्या धर्मातराच्या चळवळीच्या तीव्र प्रतिक्रिया येथील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हिंदू धर्मधुरिणांनी या चळवळीला विरोध केला असला, तरी संभाजी ब्रिगेडने मात्र या धर्मातर चळवळीचे जाहीर समर्थन केले आहे.
आणखी वाचा
First published on: 14-01-2013 at 02:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv religions last stop in the bouddh religion only