मुंबई : लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुंबईचे महापौरपद, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशी सारीच सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेले मनोहर जोशी हे अपवादात्मक नेत्यांपैकी एक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यानेच त्यांचा पक्षातील राजकीय आलेख कायमच चढत्या क्रमाचा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवसेनेच्या कोणत्याही निर्णयप्रक्रियेत बाळासाहेब ठाकरे नेहमी जोशी यांच्याशी सल्लामसलत करीत असत. सुरुवातीच्या काळात जोशी यांच्याकडे असलेल्या फियाट मोटारीतून ठाकरे दौरे करीत असत. शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळात मनोहर जोशी यांचे स्थान वरचे होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबई महानगरपालिकेत मित्रपक्षांच्या मदतीने शिवसेनेच्या वाटय़ाला महापौरपद आले, तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या मामा-भाच्यांना संधी दिली.
हेही वाचा >>>मध्य रेल्वेवर दहा जलद लोकल, नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने फेऱ्या
सन १९९० मध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले तेव्हा मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती देण्यात आली. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून पक्षात पेच निर्माण झाला होता. सुधीर जोशी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करावी, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा होती. शिवसेना भवनासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी तशी घोषणाबाजीही केली होती, पण मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अखेर मनोहर जोशी यांच्याकडे देण्यात आली.
मनोहर जोशी १९९९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. त्या वेळी लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचे विमान अपघातात निधन झाले. लोकसक्षा अध्यक्षपद मित्रपक्षाकडे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला होता. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी मनोहर जोशी यांचे नाव निश्चित झाले. २००२ ते २००४ या काळात लोकसभा अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले. सभागृहात खेळीमेळीचे वातावरण राहील आणि सर्वाना समान संधी मिळेल, असा त्यांचा प्रयत्न असे. यामुळेच जोशी यांच्यावर ते केवळ सत्ताधाऱ्यांना संधी देतात, असा आरोप झाला नव्हता.
हेही वाचा >>>संस्कृतमध्ये पायाभरणी समारंभाची कोनशिला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते रेल्वे स्थानक विकास कार्यक्रम…
नगरसेवक, महापौर, विधान परिषद आणि विधानसभेची आमदारकी, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य, लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदे मनोहर जोशी यांनी भूषविली होती. प्रत्येक पदाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
राजकारणात असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी रस घेतला होता. ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शिवसेनेत सारीच सर्वोच्च पदे भूषविण्यास मनोहर जोशी यांना जशी संधी मिळत गेल्यामुळे शिवसेनेच्या अन्य नेत्यांमध्ये वेगळी प्रतिक्रिया उमटत असे. शिवसेनाप्रमुख फक्त मनोहरपंतांनाच का संधी देतात, अशी कुजबुज नेतेमंडळींमध्ये कायम होत असे. मनोहर जोशी यांच्याकडे १९९०च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यात आल्याने भुजबळ संतप्त झाले होते. त्याच्याच पुढील वर्षी भुजबळांनी शिवसेनेत बंड केले. १९९१ मध्ये भुजबळ यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला होता. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. शिवसेना सोडण्यास मनोहर जोशी कारणीभूत असल्याचा आरोप भुजबळ यांनी जाहीरपणे केला होता.
मुख्यमंत्रीपद भूषविताना पुण्यात जावयासाठी शाळेचे आरक्षण बदलल्याचा ठपका उच्च न्यायालयाने जोशी यांच्यावर ठेवला होता. पण तत्पूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा अध्यक्षपदानंतर आणखी महत्त्वाचे पद भूषविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जोशी यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी घेतले जाऊ लागले. पण २००४च्या लोकसभा निवडणुकीत दादरमध्येच त्यांचा पराभव झाला आणि राजकीय पटलावरून ते काहीसे दूर फेकले गेले. या पराभवानंतर त्यांना २००६ मध्ये राज्यसभेची खासदारकी मिळाली पण ज्येष्ठांच्या सभागृहात साधे सदस्य म्हणून ते फारसे रमले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवाजी पार्कमधील जाहीर सभेत शिवसैनिकांनी जोशी सरांचा पाणउतारा केला होता. त्यामुळे त्यांना सभा अर्धवट सोडून जावे लागले होते. हा एक अपवाद वगळता मनोहर जोशी यांना शिवसेनेत कायमच मानाचे स्थान मिळाले होते.
अखेपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ
मनोहर जोशी शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. शिवसेनेने आपल्याला भरभरून दिले अशा शब्दांत ते कृतज्ञता व्यक्त करीत. राज ठाकरे यांनी मनसेची वेगळी चूल मांडल्यावर शिवसेना आणि राज यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. पण दादरमधील शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिलची जागा मनोहर जोशी आणि राज ठाकरे यांनी संयुक्त भागीदारीमध्ये ४२१ कोटींना खरेदी केली होती. त्यावरून शिवसैनिकांनी उघडपणे संताप व्यक्त केला होता. तेव्हा दादरमध्ये जोशींच्या विरोधात फलकही झळकले होते.
वादापासून दूर
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पण या वादात पडण्याचे जोशी यांनी टाळले होते. गेली दोन-तीन वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने ते सक्रिय राजकारणापासून दूरच होते.