शिवसेना संस्थापक आणि अवघ्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर शिवाजी पार्कवर अलोट गर्दी जमा झाली. राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्क आणि कलानगरच्या दिशेने एकवटू लागली. त्यामुळे या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू शकला असता. परंतु, गर्दीचं चोख नियोजन केलं गेलं. तत्कालीन मुंबई दक्षिण विभागाते अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिवसैनिकांची नस ओळखून यावेळी गर्दीचं नियंत्रण केलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं अंत्यदर्शन आणि अंत्यविधी सुरळीत पार पडले. या दुखद प्रसंगी लोकांच्या भावनेचा आदर करत गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण काम होतं. पण हे कठीण काम विश्वास नांगरे पाटील यांनी हुशारी आणि चलाखीने चोख पार पाडलं, याविषयी त्यांनी काही वर्षांपूर्वी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली होती.

१४ नोव्हेंबर २०१२ रोजी हजारोंच्या संख्येने लोक कलानगरच्या दिशेने जमा होत होती. प्रचंड गर्दी होती, हजारो लोक होते. १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं. या गर्दीचं नियंत्रण करणं, व्यवस्थापन करणं कठीण होतं. तरीही याचं कसं नियोजन केलं असा प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, कठीण प्रसंग होता. अचानक गर्दी मोठ्या संख्येने आली. कारण, निधनाची बातमी वेगाने पसरली. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी जमा झाले. दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याची चेन असलेले, उंचपुरे आणि दांडगे शिवसैनिक आपला बाप मेल्यानंतर जसे रडतात तसे धायमोकलून रडताना मी पाहिलं. परिस्थिती खूप चिघळायला लागली, कारण त्यांना जाता येत नव्हतं. मिळेल त्याला शिव्या घालणं सुरू होतं.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

हेही वाचा >> “त्यांनी कमळाबाईच्या दारात बसून…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “काल जे झालं…!”

“१४ नोव्हेंबर रोजी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कपाऊंडच्या आत जाताना इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी निधनाची अफवा पसरली होती. यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. दगफेक झाली, चपला फेकल्या गेल्या. त्यावेळी मी एक युक्ती केली. माझा प्रेजेंस ऑफ माईंड असेल. महिला कार्यकर्ता आणि महिला पोलिसांना पुढे तैनात केलं. हा निर्णय आत्मघातकीही ठरला असता. शिवसैनिक महिलांवर हात उगारत नाहीत असा माझा अनुभव होता. त्यामुळे मी महिला कर्मचारी तैनात केले. त्यावेळी मी लाऊड स्पीकरवर अनाऊन्स केलं की महिला कर्मचारी तैनात केले आहेत. तसंच, तुम्ही ज्या ठिकाणी चपला फेकत आहात आणि दगडं मारत आहात त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे. कृपया संयम ठेवा. ही युक्ती यशस्वी ठरली. मग परिस्थिती शांत झाली. साधारण सात ते आठ लाख लोक टप्याटप्प्याने जमा झाली होती”, अशीही माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

हेही वाचा >> बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक…”

“यावेळी तीन प्रकारचं नियोजन केलं होतं. गर्दीचं नियमन, ट्राफिकचं नियमन आणि कोणताही घातपात होणार नाही याचं नियमन केलं होतं. आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या पथकात लाठी, हेल्मेट आणि शिल्ड असलेले पोलीस होते. यांची जबाबदारी उपनिरिक्षकाकडे (Sub Inspector) सोपवली होती. तर, प्रत्येक तीन उपनिरिक्षकाची जबाबदारी एका निरिक्षकाकडे आणि तीन निरिक्षकांची जबाबदारी सहाय्यक पोलीस अधिक्षक (ACP) यांच्याकडे होती. या सर्वांचं एक पिरॅमिड करून टीम तयार केली होती. तसंच, या प्रत्येक टीममध्ये ट्राफिकचेही कर्मचारी होते. त्यामुळे सुटसुटीत बंदोबस्त झाला. या टीमना मॅनेजमेंट करणारी यंत्रणा होती. त्यांच्याशी वायरलेसमार्फत संवाद सुरू होता. त्यामुळे ही गर्दी नियंत्रण करताना फायदा झाला”, अशी माहिती विश्वास नांगरेंनी दिली होती.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्याने आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिंदे गट आदल्या दिवशी सायंकाळी स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतात. काल (१६ नोव्हेंबर) शिंदे गट स्मृतीस्थळावर गेले असता तिथे तुफान राडा झाला. याचे पडसाद आजही उमटत आहेत.