पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांची बाजू घेणाऱ्या ‘सामना’ दैनिकाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात संबंधित मॉडेलने नकार दिला आहे. सदर प्रकरण न्यायप्रवीष्ट असताना एखाद्या वृत्तपत्राने अशा संवेदनाक्षम प्रकरणात एक विशिष्ट बाजू घ्यावी, हे योग्य नसल्याचे मत या मॉडेलने व्यक्त केले आहे.
आपल्या आणि पारसकर यांच्यामध्ये झालेल्या ईमेल पत्रव्यवहारात आपण सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आपल्याला तक्रार दाखल करण्यासाठी सहा महिने का लागले, असा सवाल कोणी करीत असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की, मी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रार करायला हवी होती तो परिसर त्यावेळी पारसकर यांच्या अखत्यारीत येत होता.
पारसकर यांच्याविरुद्ध कोणत्याही पोलीस ठाण्याने तक्रार घेतली असती का, असा सवालही तिने केला आहे.
या प्रकरणी आपण जेव्हा पोलीस आयुक्त राकेश मारीया यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा पारसकर यांच्या पत्नीचा आपल्याला धमकीचा फोन आला होता, याकडेही या मॉडेलने लक्ष वेधले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा