उद्धव ठाकरे यांचे सरसंघचालकांवर शरसंधान; हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना आक्रमक
‘भारतमाता की जय’ म्हणण्याची सक्ती नको, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टोला लगावला असून ‘असा नेभळटपणा शिवरायांना मान्य नाही’, असे परखड मतप्रदर्शन त्यांनी केले आहे. ‘दारुल उलूम देवबंद’ने या घोषणेविरोधात फतवा काढला असताना ठाकरे यांनी मात्र जे ‘भारतमाता की जय म्हणणार नाहीत, त्यांच्या जिभा हासडा,’ असे म्हटले आहे. दुसरीकडे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भगवा हा राष्ट्रध्वज आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत मानले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. शिवसेना व संघाच्या माध्यमातून आक्रमकपणे उसळत असलेल्या या भगव्या लाटांमुळे सत्ताधारी भाजपची मात्र कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
एकेकाळी िहदुत्वाची कास धरलेल्या भाजपने आपला ‘रामरथ’ विकासाच्या वाटेवर नेला आणि सत्ता आल्यावर हिंदूुत्वापासून फारकत घेतल्याची टीका कडव्या हिंदू संघटनांकडूनच करण्यात येत आहे. या संघटना भाजपवर नाराज असून पाकिस्तानशी संबंध, ‘भारतमाता की जय’चा जयघोष आदी मुद्दय़ांवरून शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूुत्ववादी नेते हे आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या शिवराय संचलनात ‘भारतमाता की जय’ न म्हणणाऱ्यांच्या जिभाच हासडल्या पाहिजेत, असे परखड मतप्रदर्शन ठाकरे यांनी केले. हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना आणि संघाची भूमिका एक असली, तरी ‘भारतमाता’च्या मुद्दय़ावर सरसंघचालकांनी घूमजाव केल्याने ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. याच गदारोळात ‘दारुल उलूम देवबंद’ने ‘भारतमाता की जय’ म्हणू नका, असा फतवा काढला. त्यामुळे हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावरून वातावरण तापत असून शिवसेना आणि संघाकडून आक्रमकपणे त्यास खतपाणी घातले जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना हिंदूुत्व, देशभक्ती आणि भगवेकरणावरून मतमतांतरांचे पडसाद उत्तरप्रदेशसह आगामी निवडणुकांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ भाजप नेत्यांनी िहदुत्वाऐवजी विकासाच्या मार्गाला पसंती दिली आहे. शिवसेनेने कायमच हिंदुत्वाचा पुरस्कार केला असून िहदू मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी भाजपशी युती केली. विधानसभा निवडणुकीआधी युती तुटली आणि आता केवळ तात्पुरती सोय म्हणून भाजपला पाठिंबा दिला असल्याचे ठाकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काळात शिवसेना िहदुत्वाच्या मुद्दय़ावर आक्रमक होणार असून त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा