मुंबई : महानगर गॅस लिमिटेडद्वारे मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये गॅस वाहिन्यांद्वारे गॅस पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गॅस धारकांच्या देयकांमध्ये सुविधा शुल्काच्या नावाखाली दहा रुपये वसूल केले जात आहेत. त्याबाबत ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून सुविधा शुल्क तात्काळ रद्द करून गॅसधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महानगर गॅसचे अधिकारी आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्यात मंगळवारी नुकतीच बैठक झाली. शिवसेना ठाकरे गटाने महानगर गॅस लिमिटेडकडे याबाबत तक्रार केली आहे. मुंबई व आसपासच्या शहरातील सुमारे १७ लाख ग्राहक महानगर गॅसशी जोडले गेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महानगर गॅसने सुविधा शुल्क वाढवल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. ग्राहकांपर्यंत देयक पोहोचवणे हे कंपनीचेच काम असल्याने सुविधा शुल्क आकारणे योग्य नाही. देयक मिळाले तरच ग्राहक वेळेवर देयक भरू शकतात. दहा रुपये सुविधा शुल्कासह १८ टक्के जीएसटी वसूल करून ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकण्यात येत आहे. त्यामुळे हे शुल्क तात्काळ रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेने बैठकीत केली.