हाजी अलीप्रकरणी शिवसेनेची भूमिका
मंदिर, मशीद किंवा कोणत्याही धार्मिकस्थळांमध्ये महिलांना प्रवेशाचे समान अधिकार असावेत, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी सांगितले. महिलांनी हाजीोअली दग्र्यामध्ये प्रवेश केल्यास त्यांना चपलेने मारण्यात येईल, असे पत्रक शिवसेनेचे उपनेता अराफत शेख यांनी काढले आहे. पण ते त्यांचे वैयक्तिक मत असून शिवसेनेची भूमिका नाही. न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी सरकार व पोलिसांनी केली पाहिजे. धार्मिकस्थळी महिलांच्या प्रवेशास विरोध करणे योग्य नसल्याचे सांगून शेख यांना समज दिली असल्याचेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader