सोनारपाडा भागात बुधवारी सायंकाळी शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत ठाकूर आपल्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. कार्यालयात बसलेले संजय पाटील, उपसरपंच गोरख ठाकूर यांनाही हल्लेखोरांनी या वेळी लक्ष्य केल्याने तेसुद्घा जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी कार्यालयातील फर्निचरची मोडतोडही केली.  या प्रकरणी दोन तरुणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. राजकीय द्वेषातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Story img Loader