शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दुरध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी नागपूरातील रवी भवन येथे असताना, त्यांना धमकीचा फोन आला. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. धमकी देणाऱ्याने त्यांना यावेळी शिवीगाळही केली. शिंदे यांनी फोन उचलताच समोरच्या व्यक्तीने शिंदे यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिंदेंनी नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना फोनवरून सगळा प्रकार सांगितला. सध्या नागपूर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, शिंदे यांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

Story img Loader