Uddhav Thackeray : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाबिघाडी सरकारकडून फसव्या योजनांचा पाऊस पाडायला लागले आहे. त्यांचा आतापर्यंतचा कारभार विसरून आणि फसव्या योजनांना भुलून जनता मतदान करेल, अशी त्यांची वेडी आशा आहे. या योजनांमध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आहेत. याशिवाय लाडका मित्र, लाडका कंत्राटदार किंवा लाडका उद्योगपती ही योजनाही सरकारने आणली आहे. या योजनेविरोधात मागच्या वर्षी मोर्चा काढला होता. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीकरांना हक्काचे घर त्याचठिकाणी ५०० चौरस फूटांचे असले पाहीजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव

धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. तिथल्या प्रत्येक घरात कुटीरद्योग चालतो. अनेक छोटे छोटे उद्योग याठिकाणी चालतात. त्या उद्योगांचे काय होणार? हा प्रश्न आहे. सरकारने याठिकाणी बेसुमार टीडीआर काढून अदाणीला देण्याचा त्यांचा डाव आहे, तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईभर अदाणींकडून टीडीआर विकत घेतला पाहीजे, ही अट आता राज्य सरकारने टाकली आहे. त्याविरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. मागच्या आठवड्यात काही बातम्या आल्या आहेत. मोदी आणि शाह यांनी मुंबईची गिफ्ट सिटी गुजरातला पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदाणी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. उद्या कदाचित हे मुंबईचे नाव बदलून अदाणी सिटी करतील, पण आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

हे वाचा >> ‘लाडकी बहीण योजना सरकारचा डाव’, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “आता लाडकी मेहुणी..”

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. मराठी माणूस पेटला तर अनेकांच्या डोक्यातील हवा बाहेर काढतो आणि मुंबई वाचवतो, हा इतिहास आहे. मुंबईला लुटण्याचे आणि मुंबईची तिजोरी रिकामी करण्याच जे चाळे सुरू आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्य सरकारने अदाणींना जेव्हा टेंडर दिले, तेव्हा त्यात नसलेल्या गोष्टी ते आता अदाणीला देऊ करत आहेत. वारेमाप एसएफआय अदाणींना देण्याचे कारस्थान रचले जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader uddhav thackeray criticizes modi shah plan to make mumbai adani city kvg
Show comments