मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर भाजप भ्रष्ट व नियमबाह्य पद्धतीने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेकायदेशीरपणे वागले, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत उलटतपासणीच्या वेळी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवसेना आमदारांना गैरमार्गाने सुरतमार्गे गुवाहाटीला पळवून नेण्यात आले, असे मला प्रसिद्धीमाध्यमातून आणि जनतेमधील चर्चेतून समजले, असेही त्यांनी नमूद केले. या सुनावणीत काही मुद्दय़ांवर ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली.
हेही वाचा >>> दूध दरवाढ बैठक निष्फळ; दरवाढीचा शासन आदेश अमान्य; २४ नोव्हेंबर रोजी दूध उत्पादकांचे आंदोलन
आमदार अपात्रता याचिकांवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रभू यांची उलटतपासणी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे तुमच्या निवडणूक प्रचाराच्या पत्रकांवर (पोस्टर) होती का, असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारल्यावर मला आठवत नाही, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र होते, असे प्रभू यांनी नमूद केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात निवडणुकीत प्रचार केला होता का, भाजपबरोबर युती होती का, भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करुन जनतेकडून मते मागितली होती का, असे विचारता मला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि मी कोणावरही टीका न करता मी केलेल्या विकासकामांच्या आधारे जनतेकडून मते मागितली, असे उत्तर प्रभू यांनी दिले.
भाजपने भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, आमदारांना पळवून नेले होते का, याचे पुरावे आहेत का, शिंदे हे संपर्कात नव्हते, त्यामुळे ठाकरे यांच्या सूचनेवरुन मिलींद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे त्यांना भेटण्यासाठी गेले होते का, आदी प्रश्नांना उत्तर देताना प्रभू म्हणाले, आमदारांना पळवून नेले किंवा भाजपने भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, आदी मुद्दय़ांवर मी अधिकृतपणे (ऑन रेकॉर्ड) याचिकेत मुद्दे मांडले आहेत.
हेही वाचा >>> वंचित आघाडीच्या सभेचे राहुल गांधी यांना निमंत्रण ; शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबरला सभा
शिंदे हे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नव्हते, हे खरे आहे. नार्वेकर आणि फाटक हे त्यांना भेटण्यासाठी का गेले, कोणती चर्चा झाली, याविषयी मला माहिती नसल्याचे प्रभू यांनी नमूद केले.
जेठमलानी यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी काही वेळा आक्षेप घेतले व प्रभू यांची उत्तरे योग्यप्रकारे इंग्रजीत भाषांतरीत करुन नोंदवली जात नसल्याचे सांगितले. तेव्हा प्रभू यांची उलटतपासणीतील उत्तरे मराठीत नोंदविण्यात आली. तर वकिलांच्या सल्लाने किंवा प्रभावाखाली प्रभू उत्तरे देत असल्याचा आरोप शिंदे गटातर्फे करण्यात आला. त्यावर कामत संतापले. तेव्हा वेगवेगळय़ा आक्षेपांवर वाद करण्यापेक्षा कायदेशीर मुद्दे मांडण्याच्या सूचना नार्वेकर यांनी वकिलांना दिल्या.
रविवारी ३ डिसेंबरलाही सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांसंदर्भातील अपात्रता याचिकांवर अध्यक्ष नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे बुधवारपासून सलग तीन दिवस सुनावणी होईल आणि त्यानंतर २८ नोव्हेंबर ते तीन डिसेंबपर्यंत दिवसभर सुनावणी होणार आहे. ३ डिसेंबरला रविवारीही सुनावणी होईल.