शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिवस आहे. या निमित्त शिवतीर्तावरील स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी सुरू आहे. तर शिंदे गटाकडून स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येस म्हणेज कालच अभिवादन करण्यात आलं. मात्र यानंतर शिवसेना(ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडल्याने आता ठाकरे आणि शिंदे गटात काहीसी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…ते पाहिलं की असं वाटतं त्यांनी या स्मृतिस्थळावर येऊच नये”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा!

अरविंद सावंत म्हणाले, “विचारधार!, विचारच नाही तर धारा कुठून असणार. गद्दारी ही त्यांना अजिबातच मान्य नव्हती. भाषावर प्रांतरचना आहे, प्रत्येक राज्याची भाषा आहे.मग सगळ्यांना एकत्र कसं करायचं तर मग हिंदुत्वाचा दोरा विणला आणि ही सगळी राज्यांची फुलं त्यांनी त्यामध्ये गुंफली आणि त्यांनी हिंदुत्व देशाला सांगितलं ते राष्ट्रहिताचं होतं. सर्वात महत्त्वाचं हिंदुत्व स्वीकारताना त्यांनी मला देवळात घंटा बडवणारा हिंदू अभिप्रेत नाही, दहशतवाद्यांना बडवणारा हिंदू. असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की जातपात धर्म याच्यापलीकडे जो या देशासाठी उभा राहील तो माझा. ही भूमिका त्यांची होती आणि ते हिंदुत्व धर्माधिष्ठित नव्हतं, ते राष्ट्रधर्माधिष्ठित होतं त्यांची आज स्मृती आहे.”

हेही वाचा – “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते”; उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा!

याबरोबर, “म्हणून विचारधारा सांगणाऱ्यांनी बाष्कळ बोलण्यापेक्षा सरळ अंतर्मुख व्हावं. महाराष्ट्राला मागे नेऊ नये, महाराष्ट्र सगळ्याबाबतीत मागे चालला आहे. आज शिवसेनाप्रमुखांनी त्यांना कुंचल्याने, वाणीने आणि लेखणीने आसूड मारले असते. म्हणून आज त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना, होय तुमची विचारधारा घेऊन शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षप्रमुखांनी एक पाऊल पुढे शिवसेना नेली आहे, साहेब तुम्ही निश्चिंत रहा, आमच्यात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या भगव्याशी कधी प्रतारणा करणार नाही आणि उद्धव ठाकरेंसोबत आम्ही सतत आयुष्यभर राहू, एवढच यानिमित्त सांगतो आणि अभिवादन करतो.” असंही यावेळी अरविंद सावंत यावेळी म्हणाले.