किरीट सोमय्यांचा आरोप; राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाइन कंपनीत भागीदारी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी केला. तर भाजप नेत्यांची मुले चणे-फुटाणे विकतात का, असे प्रत्युत्तर खासदार राऊत यांनी दिले. मी आत्तापर्यंत कोणाच्याही कुटुंबावर बोललो नाही. पण सोमय्या यांनी  मोठी चूक केली असून त्यांना  याची किंमत  चुकवावी  लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

खासदार राऊत यांचे मित्र अशोक गर्ग यांनी २००६ मध्ये मँगपी ग्लोबल लि. कंपनी स्थापन केली.  खासदार राऊत यांच्या कुटुंबीयांनी १६ एप्रिल २०२१ रोजी मँगपी समूहाशी भागीदारी केली. राऊत यांच्या दोन्ही मुली विधिता व पूर्वशी या कंपनीत संचालक आहेत. या दोन्ही कंपन्या हॉटेल्स, पब, बार आदींना वाईन पुरविण्याचे काम करतात. सुपर मार्केट व दुकानांमधून वाईन पुरविण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने राज्य सरकारबरोबरच राऊत कुटुंबीयांचा महसूलही वाढेल, असा आरोप सोमय्या यांनी केला. सोमय्या यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, मी यांच्या घरात घुसल्यास धरणी दुभंगेल. मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे.  आमची एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. मी त्यांच्या नावावर करून देईन. एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल, तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणे, चोऱ्या-माऱ्या करणे यापेक्षा कष्ट करणे कधीही चांगलेच आहे.

राऊत यांचे उत्तर

किरीट सोमय्या व अन्य भाजप नेत्यांची मुले चणे-शेंगदाणे, केळी विकतात का? अमित शहा यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का? मुले काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस किंवा अन्य नेत्यांची मुले वांद्रा किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल की डान्सबार टाकणार आहेत ? भाजपच्या नेत्यांचे किती साखर कारखाने आणि वायनरीज आहेत ते पहावे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी   घाणेरडे राजकारण सुरू केले  असून ते उलटल्याशिवाय  राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

Story img Loader