शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची शनिवारी सदिच्छा भेट घेतली. पाच राज्यांमधील निवडणुकीत यश मिळणार असल्याचे चाचण्यांचे अंदाज जाहीर झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी मोदी यांना ‘आगाऊ’ शुभेच्छा दिल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेली ही भेट पूर्वनियोजित होती.

Story img Loader