Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला अर्ज मागे घेण्यासाठी तयार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी (२ नोव्हेंबर) बोलत असताना सदा सरवणकर यांना पाठिंबा असल्याचे सुचित केले. त्यानंतर सदा सरवणकर यांनी आता थेट राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाचा मुख्यमंत्री होणार, असे विधान मध्यंतरी केले होते. या विधानाचे पडसाद माहीम विधानसभेच्या निमित्ताने उमटू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

सदा सरवणकर काय म्हणाले?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांनी मला आशीर्वाद दिला आहे. मी अर्ज भरल्यानंतर प्रचारही सुरू केला आहे. मी ज्या मतदारांसाठी मागच्या १५ वर्षांपासून काम करतोय त्यांच्यावर माझा विश्वास आहे. माझ्यावर ते प्रेम करतात. ते मला विजय मिळवून देतील. मी सामान्य घरातील माणूस आहे. ३० वर्षांपासून सेनेसाठी काम करत आहे. माहीम विधानसभेतील प्रत्येक गल्लीत, घरात माझ्या कामामुळे माझी ओळख निर्माण झाली आहे. काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर कुणी अन्याय करत असेल तर त्यावर निश्चितच प्रतिक्रिया उमटणार आणि मतदारसंघातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे, याबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारला असता सदा सरवणकर म्हणाले की, महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा, असा प्रयत्न तीनही पक्षप्रमुखांचा आहे. त्यामुळे हा विषय इथे संपला असून आता प्रचाराला सुरूवात झाली आहे. माहीमच्या जनतेला धनुष्यबाणाच्या चिन्हावरील उमेदवार विधानसभेत हवा आहे.

राज ठाकरे आमच्यासाठी बाळासाहेबांची प्रतिकृती

अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मनसेकडून कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. राज ठाकरेंची जर भेट मिळू शकली तर मी नक्कीच त्यांना भेटून विनंती करणार आहे. बाळासाहेबांनी आजवर कधीही निवडणूक लढविली नव्हती. त्यांनी नेहमीच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला. आम्ही राज ठाकरेंनाही बाळासाहेबांची प्रतिकृती मानतो. ते मोठे नेते आहेत. मी या मतदारसंघाला माझ्या आईप्रमाणे सांभाळले आहे. आई आणि मुलाचे हे नाते तुटू नये, यासाठी राज ठाकरेही मला आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा आहे.

Live Updates