शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारचा निर्णय  वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशातील अलिगड येथील एका नागरिकाने याबाबत थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडेच माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे.
 शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे याचे राज्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. मात्र बाळासाहेब हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य वा मंत्री नसतनाही त्यांच्यावर कोणत्या नियमाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अलिगड येथील जामीली मोहम्मद याने माहितीच्या अधिकारात मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत माहिती मागितली आहे. ठाकरे यांच्यावर कोणत्या नियमाने शासनातर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यासाठी कोणाची बैठक झाली, यापूर्वी अशाप्रकारे कोणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते का, आदी माहिती मागविण्यात आली आहे.    

Story img Loader