मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपापासून ते ‘नकली सेना’ ठरवण्यापर्यंत भाजपकडून शिवसेनेला हिणवले जाते. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

भाजपकडून सुशासनाचे धडे दिले जातात. पण महाराष्ट्रात भ्रष्टाचारी नेत्यांची तळी भाजपचे नेते उचलत आहेत. मुंबईत शिवसेना शिंदे गटाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप असलेल्यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सारे नेते झाडून दाखल झाले होते. आरोप सिद्ध झालेले नाहीत, अशी वकिली भाजपचे नेते करीत आहेत. ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, असा दावा केला जातो. यांच्याबरोबर आल्यावर सारे गुन्हे माफ होतात. एक प्रकारे ही भाजपची भ्रष्टाचाराची गॅरंटीच आहे. रवींद्र वायकर म्हणतात मी मदत करू शकलो नाही म्हणून तेथे गेलो. त्यांना अपेक्षित मदत मी करू शकत नव्हतो. तेथे गेल्यावर सारे माफ झाले. मग त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुढे काय झाले? हीच भाजपची भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Best bus accident Kurla, BJP demands inquiry Best bus,
बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

संघराज्य पद्धत मोडण्याचा डाव!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबत राहिल्या, कारण यांना संघराज्य पद्धतच मोडीत काढायची आहे. आम्हाला मोदी सरकार नको तर आम्हाला भारत सरकार हवे आहे. हे संघराज्य पद्धतच मोडायला निघाले आहेत. ज्या पद्धतीने दिल्लीत केजरीवाल सरकारला न्यायालयाने दिलेला अधिकार यांनी लोकसभेत बहुमताने फिरवला. तसेच राज्याचे अधिकारच काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी त्यांना ४०० पार जायचे आहे. कारण राज्यघटनेत त्यांना मूलभूत बदल करायचे आहेत. सगळे एककेंद्री करायचे आहे आणि आम्हाला विकेंद्रीकरण करायचे आहे. राज्यघटनेत नमूद केले आहे त्यानुसार फक्त आपत्कालीन परिस्थितीत आणि देशाच्या बाहेरील प्रश्नांमध्येच केंद्राचा अधिकार असतो. अन्यथा केंद्र आणि राज्याचे अधिकार समान आहेत. एक कर प्रणाली, एकत्रित निवडणुका हा यांचा कार्यकम आहे. ‘एक देश, एक प्रधान, एक विधान’ हे देशासाठी घातक आहे. हे हुकूमशाहीकडे नेणारे आहे. संघराज्य पद्धत मोडून ही सगळी राज्य आपली गुलाम झाली पाहिजेत, सगळी राज्य अगदी मुंबईनेसुद्धा रोज उठून केंद्राकडे भीक मागितली पाहिजे अशा पद्धतीने हे काम सुरू आहे.

हेही वाचा >>> ‘ते उद्या ‘संघा’लाही नकली म्हणतील!’

राज्यांना करांचे अधिकार पुन्हा द्या

वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी मध्ये जे काही बदल करणे गरजेचे आहे ते आम्ही करणार. म्हणून मी माझ्या वचननाम्यात ‘कर दहशतवाद’ हा शब्द वापरला आहे. हा ‘कर दहशतवाद’ आम्ही बंद करणार. माझे मत आहे की, एक राष्ट्र, एक करप्रणाली या भाकडकथा आहेत. प्रत्येक राज्यांना त्यांचे त्यांचे अधिकार परत दिले पाहिजे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर प्रचलित पद्धतीत मी बदल सुचवणार आहे. एक रुपया कर भरला जात असेल तर त्यातले फक्त आठ पैसे मिळतात. हे बदलायला पाहिजे.

यांना कुणी लग्नाचे आमंत्रण देऊ नये…

लालूप्रसाद यादव आणि नितिशकुमार यादव यांचे जे पहिले सरकार होते ते कोणी पाडले होते? त्यांच्या सुखी संसारात तुम्ही का घुसलात सवत म्हणून… म्हणून मी नेहमी म्हणतो यांना कोणीही लग्नाचे आमंत्रण देऊ नये. हे लग्नात जातील. कोणाला वाटेल हे मुलाकडचे, मुलाकडच्यांना वाटतील हे मुलीकडचे. लग्नात श्रीखंड, ३५ पुरणपोळ्या वगैरे खातील आणि नवरा-बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नाला जातील, अशी त्यांची वृत्ती आहे.

आणखी एक भाऊ वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत माझ्या आजारपणात भावासारखी काळजी घेतल्याचे सांगितले. आज त्यांच्या भावामध्ये आणखी एकाची वाढ होईल. कदाचित या भावाच्या घरीही ते जातील. (ठाकरे यांचा हा रोख राज ठाकरे यांच्या महायुतीच्या सभेला उपस्थितीवर होता.)

जो देईल मला साथ त्याचा करणार घात

महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व दिल्लीने संपविले आहे. आज भाजपच्या उमेदवार यादीकडे नजर टाकली तर संपूर्ण देशभरात शंभर सव्वाशे उमेदवार हे काँग्रेसमधून, इतर पक्षातून आलेले आहेत. नितीन गडकरी यांचे पंख छाटले आहेत. मुंबईमध्येसुद्धा सहा जागांपैकी दोनच भाजपचे आहेत. त्यातही भ्रष्टाचारी आहेत. बलात्काराचे आरोप झालेले प्रज्वल रेवण्णा पण त्यांच्यासोबत आहेत. ते मला नकली सेना म्हणतात. पण त्यांचा तकलादू भाजप त्यांना कळला की नाही. मूळ भाजप ज्यांच्याबरोबर आमची युती होती तोच आता राहिला नाही. त्यांच्याबरोबर राहण्यात आणि परत जाण्यात मला स्वारस्य का असावे? त्यांनी त्यांचे नेते संपवले. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांना संपविले. विरोधी पक्ष संपवायला निघाले, मित्रपक्षही संपवले. शिवसेनेबरोबर जो त्यांनी खेळ केला तो त्यांच्या अंगाशी आला. गोव्यामधला मगोपक्ष त्यांनी संपवला. बिष्णोईचा पक्ष संपवला. म्हणजे ‘जो देईल मला साथ त्याचा करणार मी घात’ हीच त्यांची वृत्ती आहे.

सरकार देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे सांगते. मग भुकेलेल्या कुटुंबांना मुसलमानांची भीती दाखवून किती वेळ शांत बसवू शकता? भाजपला लोकांच्या आक्रोशाची भीती असून यातूनच मुसलमानांची भीती दाखविली जात आहे. गेली १० वर्षे तुम्ही राज्य करताय. तरीही अजून भीती का वाटते. ही भीती नष्ट का केली नाही? ज्यांची सीबीआय, अंमलबजाणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे, अशा तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची चौकशी थांबवलेली आहे. आता तर आरोप सिद्ध होईपर्यंत ते दोषी नाहीत असा कांगावा केला जात आहे. चौकशी थांबवून, त्यांना अभय दिल्यावर आरोप कसे सिद्ध होणार? याचा अर्थ भ्रष्टाचाऱ्यांचे रक्षण हीच खरी मोदी गॅरंटी म्हणावी लागेल.

महाराष्ट्रातील चित्र काय आहे?

राज्यातील सध्याचे राजकीय चित्र हे पूर्णपणे लोकशाहीचे रक्षण करणारे दिसते. हुकूमशाहीला, गद्दारांना आणि त्यांच्या सूत्रधारांना गाडणारे दिसते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या राज्याशी जी गद्दारी झाली ती केवळ शिवसेना फोडण्यापुरती नाही. ज्या राज्याने मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांत मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून ४० पेक्षा अधिक खासदार निवडून दिले, त्याच मोदी यांनी राज्यातील विविध उद्याोग, वित्तीय केंद्र गुजरातला पळवून नेत या राज्याशी मोठी गद्दारी केली. मुंबईतील हिरे बाजार पळवून गद्दारी केल्याने महाराष्ट्र पेटून उठला आहे.

मोदी शब्दांचे पक्के, पण…

मोदींना फायदा न होणारी ही निवडणूक आहे. मोदी शब्दांचे पक्के आहेत. त्यामुळे ते नक्कीच ७५ वर्षांचे झाल्यानंतर निवृत होतील. त्यामुळे ४ जूनला सरकार पडल्यानंतर भाजपचे काय होणार? मोदी निवृत्त झाल्यावर भाजपकडे चेहरा नसल्याने या पक्षाचे काय होणार? म्हणूनच मोदी भाजपचे नेतृत्व करण्यासाठी अन्य पक्षांकडे डोळे मारत असावेत. जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे मोदींखेरीज दुसरा चेहरा नाही एवढी नामुष्की या पक्षावर का यावी? याचे कारण त्यांनी पक्षातील नेतृत्वच संपविले आहे.

त्याच घाटकोपरमध्ये फटाके?

मतांसाठी मोदींना आता बाळासाहेबांची आठवण झाली असून ते बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गेले… मतांसाठीच त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत रोड शो केला. त्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्याहीपेक्षा संतापजनक बाब म्हणजे घाटकोपरमध्ये ज्या परिसरात दोन दिवसांपूर्वी होर्डिंगची दुर्घटना घडली होती, त्याच परिसरात फटाके वाजवून फुले उधळत मोदींनी रोड शो केला ही अत्यंत निर्घृण गोष्ट आहे. यांना कशाचे काहीही सोयरसुतक नाही.

शिवसेना फोडण्याच्या कटाचे मोदीशहा सूत्रधार

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मी पुन्हा भाजपला प्रस्ताव दिला होता, असा आरोप माझ्यावर होतो आहे, मी प्रस्ताव दिला असता तर तो स्वीकारला का नाही? मी त्यांना चांगली भोजनाची थाळी दिली होती मग चोरून खाण्याची दुर्बुद्धी त्यांना का झाली. म्हणजे सरकार पाडण्याचा कट आधीच ठरवला होता हे त्यांनी मान्य केले आहे. मोदी आणि शहा यांनी मदत केल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिलीच आहे. ‘मी करेक्ट कार्यक्रम केला आहे, आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा’ असे शिंदे बोलले आहेत. मग मोदी आणि शहा यांनी खरी शिवसेना आणि चिन्ह त्यांना दिले. म्हणजे या कटाची तयारी काही महिने, वर्ष आधीपासून सुरू होती आणि या कटाचे सूत्रधार हे मोदी आणि शहा आहेत हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयात एक चांगला पुरावा आहे.

नोटाबंदी फसली

पंतप्रधानांनी देशात सन २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली. त्यावेळी, देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी आपल्याला केवळ १०० दिवस द्या. काळे धन नष्ट झाले नाही तर चौकात येतो, आपण सांगाल ती शिक्षा भोगण्याचे आर्जव जनतेला केले होते. नोटाबंदीला जवळपास तीन हजार दिवस झाले. त्यानंतरही मोदी म्हणतात त्याप्रमाणे अदानी, अंबानी यांनी काळा पैसा टेम्पो भरून राहुल गांधी यांच्याकडे पाठवला असेल, तर मोदींच्या ईडी, आयकर, सीबीआय या यंत्रणा बोगस आहेत. महत्त्वाचे म्हणजे नोटाबंदीनंतरही देशातील काळा पैसा नष्ट होऊ शकलेला नाही हे मोदींच्या वक्तव्यातून सिद्ध होत असल्याने, मोदींची नोटाबंदी फसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

संभ्रमित करून मते मिळवण्याचा प्रयत्न

पंतप्रधान मोदी एकीकडे आमच्यावर टीका करताना दुसरीकडे चर्चेचे दरवाजे खुले ठेवल्याचे सांगतात. मात्र भाजपसोबत जाण्याची किंवा पुन्हा चर्चेची कोणतीही शक्यता नाही. आता मागची दारे पुढची दारे म्हणता, मग आम्ही तुमच्याकडे असताना बाहेर का ढकलले. अख्खी शिवसेना तुमच्यासोबत असताना तिला संपवायला का निघालात? भाजपबरोबर चर्चेचे कोणतेही प्रयत्न सुरू नसून लोकांना संभ्रमित करून मते मिळवण्यासाठीचा मोदींचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण लोकांना एकदा फसवू शकता. सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. नमोरुग्ण, अंधभक्त अजूनही विश्वास ठेवतील पण जनता फसणार नाही.

हे कोण दंडाधिकारी?

सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जो पायंडा पाडला आहे त्यावरून देशाने काही काळ वाटचाल केल्यास ते देशासाठी घातक आहे. भाजप संपणार पण त्यांनी पाडलेला पायंडा देशासाठी घातक असून भाजपची वृत्ती देशासाठी घातक आहे. त्यामुळे हा पक्ष लवकर संपायला हवा. आम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केले म्हणून आम्हाला दंड ठोठावला, असे भाजपचे नेते सांगतात. हा भाजपचा अहंगंड आहे. आम्हाला दंड ठोठावला असे सांगणारे हे दंडाधिकारी कोण?

वित्तीय केंद्र मुंबईत सुरू करू

दोनदा ४० खासदारांची साथ महाराष्ट्राने मोदी यांना दिली. पण महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व कमी करून मोदी यांनी त्याची भरपाई केली. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईत सुरू करण्याची तयारी झाली होती. पण मोदी सरकारकडून हे वित्तीय केंद्र गुजरातमध्ये पळविण्यात आले. इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सुरू करण्यासाठी माझा पुढाकार असेल.

Story img Loader