महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच सध्या राज्यभरातच नाही तर देशभरामध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशीसंबंधित अमली पदार्थ विरोधी पथकाचे म्हणजेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपींची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी वानखेडेंनी मुस्लीम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्र सादर केल्याचा आरोप केला. तसेच वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा एक फोटोही मलिक यांनी शेअर केलाय. मात्र मलिक यांनी अशाप्रकारे वैयक्तिक आरोप करु नये असा एक मतप्रवाह सोशल नेटवर्किंगवर दिसून येत आहे. समीर वानखेडे यांनीही यासंदर्भात यापूर्वी भाष्य केलं आहे. मात्र आता नवाब मलिक करत असलेल्या या वैयक्तिक आरोपांवरुन सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही यावरुन थेट उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
समीर वानखेडेंवर होत असणाऱ्या आरोपांवरुन शिवसेनेनं पहिल्यांदाच थेटपणे आपली भूमिका मांडलीय. या सर्व प्रकरणामध्ये राज्याला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असून या प्रकरणात तो तपास यंत्रणांवरच उलटल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. अदानी यांच्या मालकीच्या बंदरावर सापडलेल्या अमली पदार्थांपासून ते भाजपाने या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेपर्यंत अनेक विषयांना हात घालत शिवसेनेने हल्लाबोल केलाय. मात्र त्याचवेळी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखामधून मोजक्या शब्दांमध्ये नवाब मलिक यांची वैयक्तिक आरोप करण्याची पद्धत चुकीच असल्याचं मत व्यक्त केलंय.
समीर वानखेडे प्रकरण: “एवढे पुरावे आहेत तर…”; जास्मिन वानखेडेंचं नवाब मलिकांना चॅलेंजhttps://t.co/lcC2RDtnaJ
— LoksattaLive (@LoksattaLive) October 26, 2021
समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण जास्मिन वानखेडेंनी पत्रकार परिषद घेतली#NCB #BJP #SameerWakhende #AryanKhanCase #NawabMalik #KrantiRedkar #jasminwankhede
नवाब मलिक यांच्यावर टीका…
“राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, पण अशा वादग्रस्त प्रकरणावर टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये हेदेखील खरेच. कठोर टीका करायला काहीच हरकत नाही, पण ती कारवाईपुरतीच मर्यादित राहील हे पाहायला हवे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र पुढे लगेच केंद्र सरकावर टीका निशाणा साधताना, “अर्थात केंद्रातील सत्ताधारी पक्षाला तरी कुठे काही भान राहिले आहे? तो केंद्रीय तपास यंत्रणांचा बेभानपणे वापर करीतच आहे. भारतीय जनता पक्षाच्या मालकीच्या या तपास यंत्रणा नाहीत. जर भारतीय जनता पक्ष या सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत ‘मालक’ बदलत असतात, हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. इतिहास याला साक्षीदार आहे,” असं म्हटलं आहे.
समीर वानखेडे प्रकरण: लग्नाचे फोटो पोस्ट करत क्रांती रेडकरचं नवाब मलिकांना उत्तर; म्हणाली, “आम्ही कधीच…”https://t.co/SBXytgelHH
— LoksattaLive (@LoksattaLive) October 25, 2021
लग्नामधील दोन खास फोटो पोस्ट करत क्रांती रेडकरने यासंदर्भात अगदी सविस्तर माहिती दिलीय.#SameerWakhende #NawabMalik #NCB #AryanKhan #NCP #Krantiredkar
एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान
“भारतीय जनता पक्षाचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही. हा पक्षसुद्धा इतर राजकीय पक्षांप्रमाणे हाडा-मांसाचाच बनलेला आहे. त्यांचेही पाय मातीचेच आहेत. हे त्यांच्या प्रमुख लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे सत्तेची तागडी वर-खाली होतच असते, हे त्यांनी विसरू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या पक्षाने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे त्यातले एक एक प्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. त्यातले नवे प्रकरण म्हणजे कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीतले उपद्व्याप. या क्रुझवर काही तरुण पोरांनी अमली पदार्थांचे सेवन केले किंवा बाळगले. सत्य काय ते त्या धाडबाज व घबाडबाज अधिकाऱ्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगाही सापडला. खानचा मुलगा आर्यन याच्यामुळे या प्रकरणास वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व त्या प्रसिद्धीमुळे एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान झाले,” अशी टीका अग्रलेखामधून करण्यात आलीय.
… पण ते फालतू प्रसिद्धीसाठी उद्योग करीत नाहीत
“सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्या संपूर्ण प्रकरणास अमली पदार्थ व्यवहाराचा रंग चढवणारे व त्यात रिया चक्रवर्तीस तुरुंगात पाठविणारे हेच अधिकारी होते. रियाकडे कोणतेही अमली पदार्थ मिळाले नव्हते. सुशांत अमली पदार्थांचे सेवन करीत होता हे खरे. हे पदार्थ देणाऱ्या-घेणाऱ्यांना रियाच्या बँक खात्यातून चार हजार रुपये गेले होते. या चार हजारांची किंमत म्हणून रियाला महिनाभर तुरुंगात राहावे लागले. चार हजार रुपयांच्या अमली पदार्थाची चौकशी करणे हे ‘एनसीबी’चे काम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र अमली पदार्थविरोधी पथक आहे व मुंबईचे पोलीस अधूनमधून कोटय़वधी रुपयांचा ‘माल’ पकडत असतात व नष्टही करतात, पण ते फालतू प्रसिद्धीसाठी उद्योग करीत नाहीत, जे रिया चक्रवर्ती आणि आर्यन खान प्रकरणात सध्या सुरू आहे,” असं या लेखात म्हटलं आहे.
“आमची एक बहीण आहे, त्यांची मुलगी ज्या…”; समीर वानखेडेंसोबतच्या नात्यासंदर्भात नवाब मलिकांचा मोठा खुलासाhttps://t.co/v5voLs1RS8

नवाब मलिक यांना एक प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितली ही माहिती#SameerWakhende #NawabMalik #NCB #AryanKhan #NCP
३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले…
“कॉर्डेलिया क्रुझवर एक-दोन ग्रॅम अमली पदार्थ सापडले व त्याचा मोठा उत्सव एनसीबीच्या समीर वानखेडे नामक अधिकाऱ्याने केला. त्याच दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३५०० किलोचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत २५ हजार कोटी इतकी आहे. या बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत. त्यामुळे प्रसिद्धी व कारवाईच्या बाबतीत ३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले. हे इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे,” असा थेट उल्लेख करत एनसीबीच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करण्यात आलीय.
टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे
“मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईनचे प्रकरण कधी आले व संपले ते कळलेच नाही, पण एक ग्रॅम चरस प्रकरण सुरूच आहे व आर्यन खानसह काही मुले तुरुंगात आहेत. कायदेपंडित सांगतात, संपूर्ण प्रकरण व मूळ पुरावे पाहता हे प्रकरण जामीन मिळावा असेच आहे. अशा प्रकरणात फसलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणा. त्यांना योग्य ती शिक्षा करा. पुनः पुन्हा त्याच चिखलात ढकलू नका, असे आपला कायदा सांगतो, पण तसे घडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले समीर वानखेडे यांच्या आधीच्या कारवाया धाडसी होत्या हे सगळे ठीक, पण शेवटी कायद्याची चौकट पाळावीच लागेल. त्यात गफलत झाली की कारवाई वादग्रस्त ठरते. संशयाच्या भोवऱ्यात सापडते. तेव्हा आपल्या कारवाया वादग्रस्त का ठरत आहेत, याचा शोध ज्याने त्याने घ्यायला हवा. पुन्हा अशा कारवाईवर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का?, याचा महाराष्ट्र सरकारने तपास करावा”https://t.co/gbWgBUu3pj
— LoksattaLive (@LoksattaLive) October 23, 2021
"मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बहिणीवर घाणेरडे आरोप केले आहेत”#NawabMalik #SameerWakhende #NCP #NCB #NCBDrugCrackdown #ncbraids
प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून
“आता या आर्यन प्रकरणातला धक्कादायक खुलासा झाला आहे. आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी मध्यस्थांमार्फत झाली. त्यातली मोठी म्हणजे आठ कोटी रुपये इतकी रक्कम अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होती. त्यातली काही रक्कम इकडे तिकडे कशी फिरवण्यात आली हे या संपूर्ण प्रकरणातील एक पंच प्रभाकर याने समोर येऊन सांगितले. या प्रकरणातला एक साक्षीदार किरण गोसावी हा आधीच बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाला की त्यास बेपत्ता केले, याचा तपास कोणी करायचा? केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखाच नव्हे तर संपूर्ण चेहराच या प्रकरणी ओरबाडून निघाला आहे. प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.
…तर तुम्ही काय करणार?
“पैशासाठी व राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, स्वतःच्या पार्श्वभागाचा कंडू शमविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा असा वापर धिक्कारार्ह आहे. राज्यांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर हे आक्रमण आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, एनसीबीचे अधिकारी राज्यात येऊन खोटी प्रकरणे करतात, लाचखोरी करतात व त्यांना जाब विचारणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे लोक देशद्रोही, असहिष्णू ठरवतात. हा नादानपणा आहे. खोटी प्रकरणे करून काळा पैसा व प्रसिद्धी दोन्ही मिळवायचे असा हा जोडधंदा सुरू झाला आहे. आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार?,” असा प्रश्न विचारण्यात आलाय.
मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे
“भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी साधनशुचिता, त्याग, राष्ट्रभक्ती वगैरे मानणाऱ्यांचा पक्ष होता. आज अशी अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे पक्षांतील जुने जाणतेही अस्वस्थ आहेत. खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातही ‘वसुली’ करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाडय़ा आहेत. या नाडय़ांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
समीर वानखेडे प्रकरण: हल्ली बायका पण असा चोमडेपणा करत नाहीत; क्रांती रेडकर नवाब मलिकांवर संतापलीhttps://t.co/J0ZaXW8ReF
"रोज शिव्या द्या, वाईट बोला असले प्रकार आमच्यासोबत सोशल नेटवर्किंगवर सुरु आहेत."#NCB #Shivsena #BJP #SameerWakhende #AryanKhanCase #NawabMalik #KrantiRedkar— LoksattaLive (@LoksattaLive) October 26, 2021