मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार कक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असे विनंतीपत्रक रविवारी शिवसेनेतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) देण्यात आले. वानखेडेवरील पत्रकार कश्राला बाळासाहेबांचे नाव देण्याचे निवेदन एमसीएकडे निलंबित आहे. त्यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले होते, असं शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
येत्या १४ मे रोजी होणा-या बैठकीत याबाबत चर्चा व्हावी असं शिवसेनेने एमसीएला म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलचे दोन सामने अमुक्रमे १३ आणि १५ मे रोजी वानखेडेवर होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात निर्णय झाल्यास योग्य मुहूर्त साधला जाईल. दरम्यान, एमसीएच्या सूत्रांनी याबाबत कोणतेच आश्वासन देण्याचे टाळले आहे.

Story img Loader