पालिकेच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत शहरातील राजकीय पक्षांचे झेंडे, फलक काढत असताना दादर मध्ये शिवसैनिकांनी या कारवाईत अडथळा आणून गोंधळ घातला.
स्वच्छ मुंबई अभियानाअंर्तगत जी उत्तर विभागाने गुरूवारी सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीपासून ही मोहिम सुरू केली. सर्व राजकीय पक्षांचे बेकायदेशीर फलक, नेत्यांचे कटआऊटस, बॅनर काढण्यात येत होते. या कारवाई दरम्यान रानडे रोड येथील शिवसेनेचा झेंडा काढण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईत अडथळा आणला. त्यामुळे ही मोहिम गुंडाळण्यात आली. यानंतर शिवसैनिकांनी उत्तर विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. दोन तास शिवसैनिकांचा गोंधळ सुरू होता. अतिक्रमण विरोधी कारवायात अडथळा आणणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांचे पद नियमानुसार रद्द करावे, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Story img Loader