महाराष्ट्रातील सरकार स्थिर ठेवण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावर महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शरसंधान साधले. शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी झाली आहे, त्यांना केवळ सरकार स्थिर करावयाचे असेल तर मंत्रिमंडळात सहभागी न होताही ते करता येते, असा टोला खडसे यांनी लगावला. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडविली. कदम यांचे विधान फारसे कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे ते म्हणाले.
कृषी व पणन विभाग, श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी खडसे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी टोलेबाजी केली.
बाहेरून पाठिंबा देऊनही ते साध्य झाले असते
महाराष्ट्रातील सरकार स्थिर ठेवण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावर महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शरसंधान साधले.

First published on: 24-01-2015 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv senas external support would have stabilize govt eknath khadse