नवी मुंबई आणि आसपासच्या परिसराशी मुंबईला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंत जाणाऱ्या २२ किलोमीटर लांबीच्या ९६३० कोटी रुपयांच्या सागरी सेतू प्रकल्पाच्या बांधकामासाठीची निविदा दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. वेगवेगळय़ा कारणांमुळे याआधी दोन वेळा या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अपयशी ठरल्याने यावेळी तरी सेतूचा मार्ग मोकळा होणार का, याबाबत उत्सुकता आहे.
या प्रकल्पासाठी मागवण्यात आलेल्या विनंती प्रस्तावांतून मे. सिंट्रा-सोमा-एसआरईआय, मे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर-ह्य़ुंदाई, मे. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर-एल अॅण्ड टी-सॅमसंग सी अॅण्ड टी, मे. टाटा रियल्टी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.-ऑटोस्ट्रॅड इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर-व्हिन्सी कन्सेशन्स, मे. गॅमन इन्फ्रास्ट्रक्चर-ओएचएल कन्सेशन्स-जीएस इंजिनीअरिंग या पाच समूहांची निवड झाली होती. त्यापैकी ‘आयआरबी’ कंपनीने कोल्हापुरातील टोलवसुलीत वाईट अनुभव आल्याचे कारण पुढे करत या प्रक्रियेतून माघार घेतली.
या प्रकल्पासाठी निविदा दाखल करण्याची मुदत २४ मे होती. पण कंपन्यांच्या आग्रहास्तव ती वाढवून आधी ५ जुलै व नंतर ५ ऑगस्ट करण्यात आली. आता सोमवारी, अखेरच्या दिवशी कोणी निविदा दाखल करते की नाही याबाबत उत्सुकता आहे.
शिवडी-न्हावाशेवा सेतूचे भवितव्य आज ठरणार
नवी मुंबई आणि आसपासच्या परिसराशी मुंबईला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंत जाणाऱ्या २२ किलोमीटर लांबीच्या
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-08-2013 at 03:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivadi nhava sheva over sea bridge decision today