मुंबई : शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास परवानगी न देणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रहिवाशांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील जमिनीवरील बीडीडी चाळींची दुरवस्था झाली असून रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि चाळींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

वरळी, ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि शिवडी अशा चार ठिकाणी बीडीडी चाळी आहेत. यापैकी शिवडी वगळता इतर चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. म्हाडाच्या माध्यमातून वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या तिन्ही चाळींच्या जागा राज्य सरकारच्या मालकीच्या असल्याने पुनर्विकास मार्गी लागत आहे. मात्र शिवडी बीडीडी चाळ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभी आहे. त्यामुळे या चाळीच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यानुसार राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच पुनर्विकासास परवानगी देऊन म्हाडाला जमीन हस्तांतरित करावी अशी मागणी केली आहे.

Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
tension in malad aksa village over rehabilitation of ineligible residents of dharavi
जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव
Yogendra Yadav belief of Bharat Jodo Abhiyaan about Maharashtra politics print politics news
महाराष्ट्र राजकारणाची दशा आणि दिशा ठरवेल; ‘भारत जोडो अभियाना’चे योगेंद्र यादव यांचा विश्वास

हेही वाचा: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाऊदचे दोन हस्तक मारणार’; मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पनाईनवर धमकीचा मेसेज

यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र केंद्र सरकारकडून यास नकार दिला जात आहे. त्यामुळे रहिवासी नाराज असून त्यांनी आता पुनर्विकासासाठी पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. रहिवाशांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. शिवडी रेल्वे स्थानकाबाहेर, बीडीडी चाळ क्रमांक ९ येथे सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपोषण करण्यात आले. रहिवाशांसह खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. हा प्रश्न केंद्राने लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.