मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी नुकतीच पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्थान मिळाले असले तरी चांगली कामगिरी बजावूनही शिवराजसिंग चौहान यांना मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीतून डावलण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणीवरही मोदीगटाचा प्रभाव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाला पसंती दिली होती. या पाश्र्वभूमीवर उद्धव यांच्याशी दिल्लीतील पक्षांतर्गत राजकारणाबाबत चौहान यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader