शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्‍यसंस्‍कारासाठी तयार करण्‍यात आलेला चौथरा आज (शनिवार) हटवण्यात येणार असल्याच्या शक्यतेने मुंबई आणि ठाणे परिसरातून शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या अंत्‍यसंस्‍कारासाठी तयार करण्‍यात आलेला चौथरा हटवण्यासाठी, पालिकेनं गृहमंत्रालयाकडे अतिरिक्त पोलिस बळ मागितल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली होती. त्यामुळे चौथरा हटवण्याच्या शक्यतेनं शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होत आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी इतर जागांचा विचार सुरू असला तरू शिवाजी पार्कवरील जागेशी आता शिवसैनिकांचं भावनिक नातं जुळलं आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. शिवाजी पार्कवरील चौथरा हा आमचे शिवसैनिकांचे श्रध्दास्थआन असून तो कोणालाही अडथळा आणत नाहिए, त्यामुळे होणा-या कारवाईला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे एकनाथ शिंदे  यांनी दिली. भावनिक कारण देऊन बाळासाहेबांच्या अंत्‍यसंस्‍कराची जागा सोडणार नसल्याचे शिवसेनेने स्‍पष्‍ट केल्यामुळे दादर परिसरात तणावाचे वातावर आहे. अंत्‍यसंस्‍कारासाठी तयार करण्‍यात आलेला चौथरा आता हटविण्‍यात यावा, अशी नोटीस महापालिका प्रशासनाने यापूर्वीच खासदार संजय राऊत आणि महापौर सुनिल प्रभू यांना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा