राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केलं जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं नसल्याची टीका केली. यावेळी त्यांनी द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा अशी टीकाही केली.

विश्लेषण : आरे वरुन शिवसेना भाजपात पुन्हा कारे… मुंबईतील मेट्रो कारशेड प्रकरण चर्चेत, नेमकं घडलंय काय?

“महाविकास आघाडीचं सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार कऱणारं होतं. आम्ही ८०८ एकर जंगल घोषित केलं होतं. हे करत असताना आदिवासींचे हक्क बाधित ठेवण्यात आले होते. कारशेड आपण कांजूरला नेण्याचा प्रयत्न करत होतो. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आरेत पुन्हा आंदोलन, आता प्रत्येक रविवारी आंदोलन होणार

“आधीचं प्लानिंग देखील चुकीचं होतं. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला द्या असं सरकार केंद्राला सांगत आहे. मेट्रो ६ सोबत अनेक मेट्रो लाईन कारशेडविना बांधायला घेतल्या होत्या. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी येतात. सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात होता. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणं आहे,” असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे. द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा अशी टीकाही त्यांनी केली.

“मुंबईने नेहमीच शिवसेनाला साथ दिली आहे. आरेवरील, मुंबईवरील आमचं प्रेम यावर राग ठेवूनच हा निर्णय घेतलाय का हा प्रश्न आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

“हे सरकार स्थगिती सरकार होणार का? स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होणार आहे याबद्दल विचार करावा लागेल. सरकार बदललं म्हणून स्थगिती देणं हे योग्य नाही,” असंही ते म्हणाले.

Story img Loader