मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या वक्तव्यांवर टीका केली जात आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केल्याने अजित पवार संतापले; म्हणाले “मुलाखत घेतली तेव्हा…”

“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“भाजपाचं राजकारण पाहिलंत तर ज्या राज्यात सत्ता हवी आहे तिथे या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

मुंब्र्यात दाढीचा वस्तरा जरी सापडला…; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जाहीर आव्हान; म्हणाले “१८ तास राबावं लागतं”

“जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. कुठेही आपल्या राज्यात वाद वाढू नयेत, संवादानी पुढे जावं यासाठी महाराष्ट्राने लक्ष दिलं पाहिजे,” असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला. तसंच हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे असंही उत्तर राज ठाकरेंना दिलं.

राज ठाकरे अयोध्येला जाण्यासंबंधी विचारलं असता त्यांना सांगितलं की, “अयोध्येतील संघर्ष संपला आहे. कोर्टाने निर्णय दिला आहे. शिवसेना अयोध्येला गेल्यानंतर कोर्टाचा निकाल आला आणि मंदिर उभं राहत आहे. मंदिर उभं राहिल्यानंतर दर्शनाला कोणीही जाऊ शकतं”.

“मुंबईकर गेली २५ वर्ष उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून सत्ता देत आले आहेत. महाराष्ट्राचा विकास कोविडच्या काळात कुठेच थांबला नाही. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेला मत दिलं जातं. उद्धव ठाकरे आणि आमचं काम पालिका निवडणुकीतील चेहरा असेल,” असंही ते म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील कार्यक्रमात उपस्थित होते. मनसेने मशिदीसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान चालिसा लावण्यावरुन त्यांनी टीका केली. “राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही. मग कधी हिंदू, मुस्लिम, जात-धर्म, दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे मोर्चे राज्यात काढले जातात त्यावेळी राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसत आहे”, असं त्यांनी सांगितलं.

“प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे होते त्याचवेळी लावू हे योग्य नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मान्य करु,” असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.