गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांच जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. मुंबईतील अनिल परब यांच्या कार्यालयाच्या बेकायदा बांधकामावरून सोमय्यांनी सातत्याने टीका चालू ठेवली होती. अखेर सोमवारी संबंधित इमारतीच्या सोसायटीनेच हे कार्यालय तोडल्यानंतर आज किरीट सोमय्या स्वत: तिथे पाहणी करण्यासाठी निघाले. या पार्श्वभूमीवर संबंधित पाडलेल्या कार्यालयाबाहेरूनच अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर आगपाखड केली.
“सोमय्या माझ्यासह राणेंच्या घरी येणार का?”
“हा विषय आजचा नाही. जेव्हा घरं वाढवण्यात आली, तेव्हा हे नियमितीकरण करण्यासाठी २० वर्षांपूर्वी अर्ज केला होता. पण ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. पण अनिल परबांचं ऑफिस तोडलं तर दहशत निर्माण करता येईल अशा विचारातून हे करण्यात आलंय. भाजपाने हा किरीट सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का? भाजपाचा या सगळ्याला पाठिंबा आहे का? हा माझा प्रश्न आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे की नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या तिथे येणार आहेत का माझ्यासोबत बघायला? मी तर म्हाडाच्या लोकांना घेऊन जाणारच आहे तिथे. ते घर कसं तोडलंय ते बघायचंय”, अशा शब्दातं अनिल परब यांनी यावेळी किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे.
Anil Parab : “ …तर मी म्हाडावर हक्कभंग दाखल करेन, उच्च न्यायालयातही जाणार” अनिल परबांचा इशारा!
“शिवसेनेचं स्वागत काय असतं, ते आता…”
“राजकीय दबावाला बळी पडून मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा जर त्यांचा डाव असेल, तर आता आम्ही रस्त्यावर आहोत. मी शिवसैनिक आहे. रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. म्हणून आम्ही किरीट सोमय्यांना आव्हान देतो की हिंमत असेल तर तू ये इथे. तुझं स्वागत करायला आम्ही तयार आहोत. गरीबाच्या घरावर वरवंटा फिरणार असेल, तर त्यासाठी मी आणि शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवार राहणार नाही. मी पोलिसांना सांगितलंय की किरीट सोमय्यांना इथे पाठवा. अडवू नका. शिवसेनेचं स्वागत काय असतं ते त्यांना आज बघू देत”, असंही अनिल परब पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
Anil Parab Office: “माझं किरीट सोमय्यांना आव्हान आहे की नारायण राणेंचं…”, अनिल परब यांची आगपाखड!
दोन वर्षं सोमय्यांना का उत्तर दिलं नाही? परब म्हणतात…
“दोन वर्षं माझ्यावर जे आरोप होत होते, त्यात कधीही किरीट सोमय्याला उत्तर दिलं नाही. कारण किरीट सोमय्याला मी तरी मोजत नाही. पण आज म्हाडातल्या गरीब रहिवाशांचा प्रश्न आलाय, म्हणून मी आज रस्त्यावर उतरलो आहे. माझ्यासोबत ५६ वसाहतींमधले रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री स्वत: गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांच्यासमोरही मी हा प्रश्न मांडणार आहे”, असंही अनिल परब म्हणाले.
“माफियागिरी पकडल्यावर तो मी नव्हेच म्हटलं….” अनिल परब यांना किरीट सोमय्यांचा टोला
“आम्ही पक्ष बदलावा म्हणून हा दबाव”
दरम्यान, आपण इतरांप्रमाणेच शिवसेनेतून बाहेर पडावं, यासाठी हा दबाव टाकला जात आहे, असं अनिल परब म्हणाले आहेत. “अनिल परबांना टार्गेट केलं, की उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं असं दाखवायचं. हा सगळा दबाव आम्ही पक्ष बदलावा, जे बाकीचे त्यांच्या गळाला लागले, तसंच आम्हीही करावं म्हणून हे सगळं चाललंय. जे आज त्यांच्या गटात आहेत, त्यांच्या बाबतीत किरीट सोमय्या एक शब्दही काढत नाहीयेत. इतके दिवस मी मंत्री होतो. मंत्रीपदाची जबाबदारी होती. इतके दिवस मी त्याला उत्तर दिलं नाही. पण आता मी एक शिवसैनिक आहे. शिवसैनिक म्हणून त्याला जे काही उत्तर द्यायचंय, ते आता मी देईन”, असं अनिल परब यावेळी म्हणाले.