मुंबईतील संततधार पावसाने विविध ठिकाणी पाणी साचल्याने आणि लोकलसेवा ठप्प झाल्याने शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेला वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
मुंबईतील पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दुपारी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील आपत्ती निवारण कक्षाला भेट देणार असून, परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
आणखी वाचा