केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना “त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे” असं विधान केलं. या विधानावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून भाजपाला साथ देणाऱ्या एकानाथ शिंदे गटातील आमदारांचाही अगदी दोन शब्दांमध्ये समाचार या विषयावर भाष्य करताना घेतला आहे. ‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी भूमिका घेत शाह यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिले. याच भाषणाला संदर्भ उद्धव यांनी मातोश्रीवर काही मोजक्या शिवसेना आमदार आणि खासदारांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत दिला.
नक्की पाहा >> Photos : मध्यरात्री ‘मातोश्री’वरुन फडणवीसांचा फोन, अडीच मिनिटांची बंद खोलीतील भेट अन्…; अमित शाहांनी सांगितला युती तुटल्याचा घटनाक्रम
शाहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “ती जमीन दाखवल्यानंतर…”; दोन शब्दांत शिंदे गटालाही टोला
"काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण. ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले," असा टोलाही त्यांनी लगावला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-09-2022 at 09:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena chief react on amit shah saying uddhav thackeray needs to be taught a lesson scsg