उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक उद्योगपती आणि अभिनेत्यांचीसुद्धा भेट घेतली. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा दौरा भाजपा पुरस्कृत राजकीय खेळ असून उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: “निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर मी लक्ष्मण जगताप यांना फोन बंद करून ठेवायला सांगितलं होतं”, अजित पवारांनी संगितली ‘ती’ आठवण!

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Sameer Vidwans on Democracy
“समुहाने निवडून दिलेली राजेशाही…”, निवडणुकीनंतर मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट; म्हणाला, “लोकशाहीच्या नावाखाली…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

“ही भाजपा पुरस्कृत राजकीय खेळी”

“उत्तर प्रदेश हे विकासाचे इंजिन आहे. त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत उतरले. मुंबईतील मोठ्या उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले, त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत ‘रोड शो’ करण्याची गरज काय? योगींच्या रोड शोमध्ये नक्की कोणते उद्योगपती सामील झाले व त्यांनी योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलतजादा म्हणजे गुंतवणूक केली, यावर सुद्धा प्रसिद्धी मिळाली पाहिजे. उद्योगपतींना भेटणे, आपल्या राज्याच्या उद्योगविषयक धोरणांबाबत प्रेझेंटेशन देणे वेगळे व त्या उद्योगपतींना आकर्षित करण्याच्या नावाखाली मुंबईत रोड शोचे आयोजन करणे वेगळे. योगींचा मुंबईतील रोड शो ही भाजपा पुरस्कृत राजकीय खेळी आहे. उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे”, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – “जनतेसाठी जाणते राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज” देवेंद्र फडणवीस यांचं छगन भुजबळांना उत्तर

“योगीजींनी गुजरातमध्ये रोड-शो का करू नये?”

“योगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते आहेत. महाराष्ट्रातील फुटकळ नेत्यांच्या सल्ल्याने वागून त्यांनी स्वतःची अप्रतिष्ठा करून घेऊ नये. उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबई-महाराष्ट्राने नेहमीच योगदान दिले आहे. मुंबईत लाखो हिंदी भाषिक रोजीरोटीसाठी येऊन चांगल्यापैकी स्थिरावले आहेत. त्यांच्याच अर्थकारणावर उत्तर प्रदेशात लाखो चुली पेटत आहेत. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. शेवटी देश व समाज म्हणून आपण एक आहोत. उत्तर प्रदेशचा विकास मुंबई निवासी उद्योगपती करणार असतील तर ते चांगलेच आहे. त्यामुळे मुंबईवरील लोकसंख्येचा भार हलका होत जाईल. प्रश्न इतकाच आहे की, योगी महाराजांनी त्यांच्या राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईबरोबरच बाजूच्या गुजरात राज्यातही जायला हवे व गुंतवणूकदारांना लखनऊच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी गांधीनगरच्या रस्त्यावर एखाद्या भव्य रोड शोचे आयोजन का करू नये?” असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकांसाठी ‘गुजरात पॅटर्न’ ; भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मोदींचे मार्गदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही केलं लक्ष्य

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डावोस दौऱ्यावरूनही शिवसेनेनं खोचक टीका केली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व इतर पन्नास लोकांची वरात डावोस येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेस निघाली आहे. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी हे बिऱ्हाड त्यांची वरात घेऊन निघाले आहे. डावोस येथे १६ जानेवारीपासून जागतिक गुंतवणूक परिषद होणार आहे. या माध्यमातून ६० ते ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याची तयारी महाराष्ट्रातील या बिऱ्हाडाने केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे बिऱ्हाड डावोसला जाऊन गुंतवणूकदारांच्या गाठीभेटी घेईल. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी डावोसच्या रस्त्यांवर रोड शो नक्कीच करणार नाहीत”, असे ते म्हणाले.

Story img Loader