पुण्यात भाजपाचे नेते तथा चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विधिमंडळ परिसरात शाई पेनावर बंदी घालण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून शिवसेनेने शिंद-फडणवीस सरकारवर लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच, पण आता धसका सरकारही बनले आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामाना’तून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Gram Panchayat Election Result 2022 : “फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीचा झेंडा; दलबदलुंचं राजकारण…” जयंत पाटलांची टीका!

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

“हा निर्णय हास्यास्पदच”

“नागपुरात सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला भलतीच हुडहुडी भरलेली दिसते आहे. भाजपा नेते व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मध्यंतरी पुण्यामध्ये जी शाईफेक झाली त्याचा मिंधे सरकारने भयंकर धसका घेतला असून आता विधिमंडळ परिसरात शाईच्या पेनावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय हास्यास्पदच म्हणावा लागेल. लेखणीत वापरली जाणारी शाई म्हणजे जणुकाही एके-४७ बंदुका किंवा आरडीएक्ससारखे विस्फोटक आहे, अशी भीती राज्यातील भाजपा-मिंधे सरकारच्या मनात घर करून बसली आहे. हा प्रकार म्हणजे पोरकटपणा आहे”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंचे डोळे अजूनही…”, ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून संतोष बांगर यांची टीका!

“…तर अशी वेळ धसका सरकारवर येणार नाही”

“महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही, अशी आचरट विधाने मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी टाळली, तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावर किंवा कोणत्याही नेत्यावर अशा प्रकारची शाईफेक होणे हे वाईटच. अशा घटनांचे समर्थन कदापि करता येणार नाही. मात्र शाईफेक करणे हे जसे चुकीचे आहे, तसेच विधिमंडळाच्या आवारात शाईचे पेन आणण्यावर बंदी घालणे हेदेखील चुकीचेच आहे”, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Winter Session 2022 : एनआयटी भूखंड वाटप रद्द; विधिमंडळात विरोधकांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

“यालाच राज्यकारभार म्हणावे काय?”

“लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारने जनतेचा विश्वास संपादन करणे, जनतेला आपलेसे करणे आणि जनतेची मने जिंकणे अपेक्षित असते. मात्र, जनतेला सुखावणे तर दूरच, पण दुखावणारे वर्तन सरकार आणि सत्तापक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात सुरू केले आहे. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या नेत्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी”, अशी टीकाही ‘सामाना’तून करण्यात आली आहे.

Story img Loader