होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे या काळात सावंतवाडीपर्यंत जादा रेल्वे गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
कोकणातील लाखो चाकरमानी मुंबईत स्थायिक झाले आहेत. ही मंडळी होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे निमित्त साधून कोकणात धाव घेतात. त्यांना विनाविघ्न कोकणात पोहोचता यावे यासाठी याकाळात सावंतवाडीपर्यंत जादा रेल्वे गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी केली आहे.

Story img Loader