शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत आणि शिंदे गटात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या बंडखोर १२ खासदारांनी संजय राऊतांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी या १२ खासदारांवर हल्लाबोल केला. ते शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत म्हणाले, “अच्छा, मी इतका मोठा आहे का? म्हणून त्यांनी मला तुरुंगात डांबलं होतं का? आत्ता मला रहस्य कळलं की, त्यांना मला उत्तर देता येत नव्हतं म्हणून त्यांनी मला १०० दिवस तुरुंगात डांबलं. हे १२ खासदारांनी सांगितलं ते बरं केलं.”

“माझ्या मौन व्रतात इतकी ताकद आहे”

शिंदे गटाकडून नोटीसही पाठवली जाऊ शकते या शक्यतेवर संजय राऊत म्हणाले, “अजून मी काहीच बोललेलो नाही. म्हणजे माझ्या मौन व्रतात इतकी ताकद आहे. किंबहुना, गेली दोन दिवस मी कटुता विसरावी असं बोलतोय. तेही त्यांना पटत नाही का?”

“त्यांना बाळासाहेब ठाकरे कळाले नाही”

“या महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता राहू नये, हे देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आशादायी आहे असं मी म्हणालो तेही त्यांना आवडत नाही. अशा भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्र कळालेला नाही. त्यांना बाळासाहेब ठाकरे कळाले नाही. त्यांना यशवंतराव चव्हाण किंवा महाराष्ट्राची परंपराही कळली नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“तुम्ही माझ्याशी काय लढता, तुम्ही शिवसेनेशी लढा,” असंही राऊतांनी नमूद केलं.

“वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार”

चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं भाजपाच्या नेत्यांचं काम झालंय. याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर उभे नाहीत. त्यांना आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी हे थांबवायला हवं.”

“टीकाकारांनी आपलं कर्तुत्व काय याचा विचार करावा”

“शरद पवार व उद्धव ठाकरे हे देशाचे प्रमुख नेते आहेत. अशी चिखलफेक करणाऱ्यांनी याचं भान ठेवावं. शरद पवार व उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी आपलं कर्तुत्व काय आहे याचा विचार करावा,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : तेजस ठाकरे राजकारणात येणार का? राऊतांच्या भेटीनंतर दानवे म्हणाले, “शिवसैनिकांकडून…”

“तुम्ही अशी विधानं केली, तर मग आम्ही आहोतच”

संजय राऊत पुढे म्हणाले, “आपल्या हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून ते आमच्या नेतृत्वावर अशी विधानं करत आहेत. त्यांनी काय विधान केलंय मला माहिती नाही, मला माध्यमांकडून माहिती मिळतीय. मात्र, अशी विधानं कोणीही करू नये. आम्ही करत नाही, तुम्हीही करू नये. तुम्ही अशी विधानं केली, तर मग आम्ही आहोतच.”