शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या कारचा अपघात झाला आहे. भरत गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेसवेवरुन निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. रस्त्यात टॅक्सी बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून माहिती देताना सांगितलं की, “टॅक्सी बिघडल्यामुळे हा अपघात झाला. टॅक्सी रस्त्यात उभी राहिली असता मागून जाणाऱ्या आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. आमची गाडी पाचवी होती, आमच्या पुढे पोलिसांची गाडी होती. पोलिसांच्या गाडीवर आमची गाडी आदळली आणि नुकसान झालं. पण कोणालाही काही दुखापत झालेली नाही. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla bharat gogavle car met with accident on eastern express highway sgy