शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी अंगावर काटा उभा राहील अशी आपल्या गुवाहाटी येथून सुटकेची ‘आपबिती’ सांगितली आहे. यात त्यांनी रात्री १२.३० वाजता रस्त्यावर चालायला सुरुवात केली तेव्हा मागे १५० पोलिसांचा ताफा असल्याचं सांगितलं. तसेच मला कोणताही आजार नसताना २०-२५ जणांना पकडून मला जबरदस्तीने इंजेक्शन दिल्याचा गंभीर आरोप केला. ते मुंबईत वर्षा निवासस्थानासमोर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.
नितीन देशमुख म्हणाले, “शिवसेनेत शब्दाला जागणारे अनेक नेते आम्ही पाहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा आदेश दिला तेव्हा त्यांनी एका मिनिटात राजीनामा दिला. तो आदर्श आमच्यासमोर आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा केंद्रात मंत्री असणाऱ्या अरविंद सावंत यांनी क्षणाचा विचार न करता राजीनामा दिला. असा हा शब्दाला जागणारा पक्ष आहे.”
“अडीच वर्षात केलेल्या कामामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशभरात जी प्रतिमा तयार झाली त्याचा धसका घेऊन भाजपाने सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत, कट रचले जात आहेत. समोर एकनाथ शिंदे दिसत असले तरी त्याचे सूत्रधार भाजपा आहे,” असं नितीन देशमुख यांनी नमूद केलं.
नितीन देशमुख यांनी जबरदस्तीने सुरत आणि तेथून गुवाहाटीला नेण्याचा घटनाक्रम नमूद करताना सांगितलं, “२० जूनला विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान तत्कालीन शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बंगल्यावर बोलावलं. गटनेत्याने बोलावल्याने मी तात्काळ त्यांच्या बंगल्यावर गेलो. तेव्हा माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाश भाऊ होते. आम्हाला गाडीत बसवण्यात आले.”
“गाडी ठाणे, नंतर पालघरकडे गेली. त्यांना विचारलं असता ते पालघरच्या आमदाराकडे चालल्याचं सांगितलं. पालघरमध्ये एका हॉटेलवर थांबल्यावर मला शंका आली. मी तेथील चहा टपरीवाल्याला विचारलं हा रस्ता कोठे जातो? त्यांनी तो रस्ता गुजरातला जात असल्याचं सांगितलं. तेथून १०० किमी गुजरात सीमा असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मनात शंका निर्माण झाली,” अशी माहिती आमदार देशमुख यांनी दिली.
“यावेळी शंभुराजे, भुमरे, सत्तार असे शिवसेनेचे तीन मंत्री तेथे आले. तिघांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मला आणि आमदार प्रकाश यांना त्यांच्या गाडीत बसवलं. त्यानंतर गाडी गुजरातच्या दिशेने सरळ गेली. आमदार प्रकाश घाबरत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपण कोठे चाललो हे विचारलं. त्यांनी वनगाकडे जायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आमदारांना गाडीतून उतरवलं आणि खासगी सचिव प्रभाकर यांच्यासोबत मधल्या गाडीत बसवलं. त्यांच्या गाडीत मंत्री सत्तार व भुमरे यांना घेतलं,” असंही देशमुख यांनी नमूद केलं.
आमदार देशमुख पुढे म्हणाले, “सचिव प्रभाकर फोनवर इतर आमदारांना घेतलं का, गाडी कुठपर्यंत पोहचली असे बोलत होते तेव्हा मला आपल्याच सरकारविरोधात कटकारस्थानासाठी गुजरातला नेलं जात आहे ही शंका खरी असल्याचं लक्षात आलं. तेव्हा ट्रॅफिक जॅम झाला. तेव्हा आमदार प्रकाश सुर्वे यांनी एकनाथ शिंदे यांना कुठे चाललो आहे, आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही कपडे आणले नाही, बॅगा आणल्या नाहीत असं सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तू पुढचा विचार करू नको, गाडीत बस असं सांगितलं. तेवढ्यात एकजण आला आणि आमदार कैलास गायब झाल्याचं सांगितलं. मला आनंद झाला.”
“मी गाडीत आमच्या नेत्यांच्या संपर्कात होतोच. मी साहेबांनाही सांगितलं. त्यांनी मला गाडीतून खाली उतरण्यास सांगितलं. मी त्यांना सांगितलं आत्ता तर उतरता येणार नाही, पण मी सुरतहून परत येईल. मला वस्तूस्थिती पाहायची होती. सुरतमध्ये पंचतारांकित हॉटेल होते. तिथे प्रचंड बंदोबस्त होता. मी महाराष्ट्रातही एवढा पोलीस बंदोबस्त पाहिला नाही. तेथे ३००-३५० पोलिसांचा फौजफाटा होता. अनेक आयपीएस अधिकारी तेथे भाजपाची गुलामगिरी करत होते. माझे त्या अधिकाऱ्यांशी वादही झाले. तुम्ही प्रशासन चालवता की भाजपाची गुलामगिरी करता असं मी विचारलं.” असं देशमुख यांनी सांगितलं.
नितीन देशमुख पुढे म्हणाले, “हॉटेलमध्ये गेल्यावर आमदार प्रकाश देखील गायब झाल्याचं समजलं. तेव्हा मला आणखी एक आमदार गेल्याने आनंद झाला. त्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना मला इथं राहायचं नाही, जायचं आहे असं सांगितलं. त्यांनी ५ मिनिटाने, १० मिनिटाने जायचं आहे असं बोलत टाईमपास केला. मी तेथून वाद करून निघालो. मी रस्त्याने चालत असताना माझ्यामागे १०० ते १५० पोलीस व गाड्यांचा ताफा होता. रात्री साडेबारा वाजता मी हॉटेलमधून निघालो. साडेबारा वाजल्यापासून तीन पर्यंत भरपावसात मी चालत होतो. तेव्हा मी अरविंद सावंत यांच्याशी संपर्क केला.”
“माझ्यामागे पोलीस असल्याने मला रस्त्यावरील चालू वाहने नेत नव्हती. कुणीही गाडी थांबवत नव्हते. अखेर मला रात्री साडेतीन वाजता नेण्यासाठी महाराष्ट्रातून गाडी पाठवण्यात आली. त्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी मला उचलून लाल गाडीत टाकलं. तेथून मला सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मला शंका आली की रुग्णालयात का आणलं. मला कोणताही आजार नाही, मला शुगर नाही, ह्रदय विकाराचा आजार नाही त्यामुळे मला शंका निर्माण झाली. मी कोणत्याही डॉक्टरांना हात लावू देत नव्हतो,” असं देशमुख यांनी सांगितलं.
“पोलीस आणि डॉक्टरांमधील संभाषणामुळे मला शंका निर्माण झाली. त्यांनी मला तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. मी तर एकदम तंदुरुस्त होतो. मी ६-७ जणांना माझ्या अंगाला हात लावू देत नव्हतो. त्यामुळे मला ह्रदयविकाराच झटका आल्याचा दावा केल्यानंतर माझा घातपात करण्याचं पोलिसांचं षडयंत्र असल्याचं माझ्या लक्षात आलं,” असंही त्यांनी नमूद केलं.
ते म्हणाले, “मी सकाळी सहा साडेसहावाजेपर्यंत म्हणजे तीन तास माझ्या शरीराला हात लावू दिला नाही. त्यानंतर २०-२५ जणांनी मला पकडलं, कुणी कंबर पकडलं, कुणी माझे हात पकडले, कुणी माझे हात पकडले, कुणी मान पकडली आणि एकाने माझ्या दंडावर जोराने इंजेक्शन टोचलं. तेव्हा आपल्यामागे माझा मुलगा, मुलगी, पत्नी असल्याचा विचार करून मी घाबरलो आणि रडलो. ह्रदयविकाराच्या नावाखाली आपला घातपात होणार आहे हे माझ्या लक्षात आलं. इंजेक्शन आल्यावर मला गुंगी आली आणि त्यानंतर मला अशा ठिकाणी नेलं जिथं एका खोलीत मला ठेवून ५० पोलीस तैनात होते. आयपीएस अधिकारी देखील होते. त्यामुळे यामागे भाजपा कसं कटकारस्थान रचत आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलं.”
“शक्तीचा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर मी गनिमी कावा खेळलो. छत्रपती शिवाजी महाराजांची जशी आग्रा येथून सुटका झाली तशीच मी माझी गुवाहाटी येथून सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात आलो. त्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. मी आमदार झाल्यावर जेवढं स्वागत झालं नाही तेवढं स्वागत माझं गुवाहाटीवरून आल्यावर झालं. अमरावती ते अकोले या दरम्यान ४-५ हजार शिवसैनिकांनी माझं स्वागत केलं. हा जनतेचा उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वास होता हे सिद्ध झालं,” असंही नितीन देशमुख यांनी सांगितलं.