शिवसेना खासदार संजय राऊत १०० दिवसांहून अधिक काळ तुरुंगात होते. अखेर त्यांना बुधवारी (९ नोव्हेंबर) जामीन मिळाला आणि ते तुरुंगातून बाहेर आले. गुरुवारी (१० नोव्हेंबर) त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि नंतर पत्रकार परिषदही घेतली. यावेळी राऊतांनी तुरुंगात दोन पुस्तकं लिहिल्याची माहिती दिली. तसेच ते लवकरच प्रकाशित होतील, असंही नमूद केलं. या निमित्ताने या पुस्तकात नेमकं काय असणार याविषयी उत्सुकता निर्माण झालीय. त्यावर स्वतः संजय राऊतांनीच उत्तर दिलं.

तुरुंगातील दिवसांमध्ये आलेल्या अनुभवावर पुस्तक येणार का? यावर संजय राऊत म्हणाले, “माझं पुस्तक तयार झालं आहे. हे अनुभव असतात हे लोकांपर्यंत पोहचवायचे असतात. मी तुरुंगात दोन पुस्तकं लिहिली आहेत. मी लिहिणारा माणूस आहे. त्यामुळे मी वेळेचे सदुपयोग केला. मी तुरुंगात सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो.”

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”

“डायरीतील गोष्टींचं पुस्तक काढावं असं मला वाटतं”

“पुस्तक किंवा वर्तमानपत्रातील जे जे वाचलं त्यातील आवडलेल्या आणि लोकांपर्यंत गेल्या पाहिजे अशा गोष्टी मी माझ्या डायरीत लिहून ठेवल्या आहेत. त्या डायरीतील गोष्टींचं पुस्तक काढावं आणि ते लोकांपर्यंत पोहचावं असं मला वाटतं. हल्ली लोकांचं वाचन कमी झालं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हल्लीची मुलं वाचत नाहीत. तरुण लोक वाचत नाहीत,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

“मी इतिहासातील काही नवीन माहिती वाचली. काही राजकीय माहिती किंवा इतर घडामोडींबाबत वाचलं,” असंही राऊतांनी नमूद केलं.

“त्या बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं”

संजय राऊत पुढे म्हणाले, “तुरुंगात असताना मी एक सुंदर बातमी वाचली. मला त्या बातमीची गंमत वाटली. केरळमध्ये एका मंदिरात एक शाकाहरी मगर होती. तिचा मृत्यू झाला. मगर शाकाहरी नसते. अनेक वर्षे ही मगर लोक देतील त्या प्रसादावर जगली. त्या मगरीचा मृत्यू झाला. त्यानंतर मंदिर व्यवस्थापन आणि संपूर्ण गावाने या मगरीची अंत्ययात्रा काढली आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्या बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं.”

हेही वाचा : संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”

ईडी कारवाईवर पुस्तक लिहिणार का? राऊत म्हणाले…

“अशा अनेक बातम्यांची मी टिपणं केली आहेत. त्या टिपणांचं पुस्तक यावं असं मला वाटतं. ते येईल,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं. ईडीची कारवाई, तुरुंगात भेटलेल्या व्यक्ती अशा विषयावर पुस्तक लिहिणार का या प्रश्नावर मात्र संजय राऊतांनी उत्तर देणं टाळलं.

Story img Loader