गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसैनिक आज शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील अभिवादन कऱण्यासाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त केला. तसंच आदित्य ठाकरेंवर टीका करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडंल.

“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार,” असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले “राज ठाकरेंच्या पाठीशीही…”

दरम्यान दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलायची आहे की उद्धव ठाकरे यांची याचा निर्णय लवकर घ्यावा असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, “दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड आणि तिथे बस, तिथून उड आणि इथे बस असंच करत असतात. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका”.

पवारांनीच राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली, केसरकरांचा दावा

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही दीपक केसरकर यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते असंही त्यांनी सांगितलं.

राणे यांनी ‘मातोश्री’वर बोलण्याचे टाळावे – दीपक केसरकर

“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले आहेत.