राज्यसभा निवडणुकीनंतर आता सोमवारी (२० जून) महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक होत आहे. महाविकासआघाडीचा राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर पराभव झाल्यानंतर आता मविआने विधान परिषद निवडणुकीत ताकद लावली आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीतील तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आज (१९ जून) शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने शिवसेनेकडून आजच्या दिवशी शिवसैनिकांसह आपल्या नेत्यांमध्ये उत्साह भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुंबईतील वेस्टइन हॉटेलमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

शिवसेनेने विधान परिषदेच्या तयारीसाठी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच रणनीती आखली आहे. यासाठी सर्व आमदारांना मुंबईतील या वर्धापन दिनाला बोलावण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या आमदारांसोबत विविध बैठका घेऊन विधान परिषदेतील आपली रणनीती तयार करणार आहेत.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Samajwadi Party Nationalist Ajit Pawar Group Shiv Sena Eknath Shinde Group are Contesting in Mankhurd Shivaji Nagar Assembly Elections Mumbai
मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात तिरंगी लढत; मुस्लिम मते ठरणार निर्णायक

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. यात म्हटलं, “५६ वर्षे जनसेवेची, प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने, तळपत्या शिवसेनेची. पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ट्वीट करत सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. शनिवारी (१८ जून) बैठका आणि आमदारांची जमवाजमव सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपाने देखील आपले आमदार जमवत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे चारही पक्ष विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी आकडेमोड करण्यात व्यग्र असल्याचं दिसत आहे.

या हॉटेल्समध्ये आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली जात असून पक्षातील मोठ्या नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जातंय. राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हॉटेल ट्रायडेंटमध्ये असून त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले आहे. शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट इनमध्ये असून मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते येथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे उद्या शिवसेनेचा वर्धापन दिनदेखील येथेच साजरा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार तसेच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनादेखील हॉटेल फोर सिझनमध्ये ठेवण्यात आलं असून येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. येथे आमदारांना मतदानाच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपानेदेखील आकडेमोड सुरु केली असून या पक्षाच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवून असे भाजपाने यापूर्वी बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजपानेदेखील रणनीती आखायला सुरुवात केली असून येथे भाजपाच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. येथे भाजपाचे बडे नेते विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विजयी गणित जुळवत आहेत.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आकडेमोडीत व्यग्र, मुंबईत बैठकांचं सत्र!

सोमवारी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी निवडणूक ही गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच कारणामुळे चारही पक्षांनी आपल्या आमदारांना चार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले असून आपापल्या स्तरावर रणनीती आखली जात आहे.